अनिल देशमुखांना एकाच दिवशी दोन धक्के; पुन्हा ED कोठडीत रवानगी  Saam TV
महाराष्ट्र

अनिल देशमुखांना एकाच दिवशी दोन धक्के; पुन्हा ED कोठडीत रवानगी

निल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणखी एक झटका बसला आहे कारण मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांची पुन्हा ईडी कोठडीत रवानगी केली आहे. अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणी देशमुख हे १ नोव्हेंबर रोजी ईडीपुढे चौकशीला हजर राहिले होते त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती.

अनिल देशमुख यांची अद्याप चौकशी पूर्ण झाली नसल्याने ईडी कोठडी मिळावी अशी मागणी करत ईडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीने केलेल्या या मागणीवर मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, देशमुख यांनापुन्हा आता ईडी चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

अनिल देशमुख यांना काल सत्र न्यायालयाने न्यायलयीन कोठडी सुनावली होती. त्याला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. आज उच्च न्यायालयात ईडीच्या याचिकेवर न्यायमूर्ती माधव जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यामध्ये उच्च न्यायालयाने ईडीच्या बाजूने निर्णय देत देशमुखांना धक्का दिला आहे. देशमुख यांच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडी पूर्ववत राहावी यासाठी प्रयत्न केले. मात्र, उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करत ईडीच्या बाजूने निर्णय दिला आहे त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT