कोट्यावधी रुपयांचे बोगस बायोडिझेल जप्त; बीड पोलिसांची मोठी कारवाई... विनोद जिरे
महाराष्ट्र

कोट्यावधी रुपयांचे बोगस बायोडिझेल जप्त; बीड पोलिसांची मोठी कारवाई...

बीड पोलिसांनी आता मराठवाड्यातील बोगस बायोडिझेल माफियांच्या नेटवर्कची शोध मोहिम सुरु केली आहे, त्यामुळे गुन्हेगारी जगतावर पोलिसांचा धाक निर्माण होत आहे.

विनोद जिरे

बीड: बीड पोलिसांनी बोगस बायोडिझेलबाबत मोठी कारवाई केली आहे. 3 टँकर पकडत 2 कोटींपेक्षा जास्त रुपयांचे 75 हजार लिटर बायोडिझेल जप्त केले आहे. बीड ACP पंकज कुमावत यांना एका गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, मुंबई व पुणे येथून बायोडिझेल घेऊन जाणारे चार टँकर हे केज मार्गे नांदेडकडे जात आहेत. ही माहिती मिळताच पंकज कुमावत यांनी रात्री 9:30 वाजता मस्साजोग येथे सापळा लावला. त्यावेळी त्यांना एक टँकर आढळून आला. पंकज कुमावत यांनी टँकरचा पाठलाग करून त्यांनी टँकरच्या चालकाला ताब्यात घेतले. अधिक विचारपूस केली असता हे टँकर बायोडिझेल घेऊन नांदेड येथे घेऊन जात असल्याचे त्याने माहिती दिली. (Bogus biodiesel worth crores of rupees seized; Big action of Beed police)

हे देखील पहा -

त्यानंतर पंकज कुमावत यांनी आपल्या पथकासह थेट नांदेड व लोहा गाठले. तेथे जाऊन त्यांनी नांदेड येथून MH 46- JE 1106, MH -04- GF -9873, MH -26- H -8496, हे तीन टॅकर्स, एक स्कॉर्पिओ, MH -21- AX 1356, ह्युंदाई MH -26 / T -9999 ) वेरना या गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. तीन टँकरमध्ये प्रत्येकी 25 हजार लिटर असे मिळून सुमारे 75 हजार लिटर्स डिझेल भरलेले आहे. एका ट्रकमध्ये एक लोखंडी टाकी व डिझेल काढण्यासाठीचे मोटर्स ठेवलेली आहे. तसेच या टँकरला झाकण्यासाठी ताडपत्री लावली होती.

याप्रकरणी चार आरोपींना देखील ताब्यात घेतले असून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कोटयावधी रुपयांच्या बायोडिझेल कारवाईमुळे ACP पंकज कुमावत यांचे राज्यात कौतुक होत आहे. आता त्यांनी मराठवाड्यातील माफियांच्या नेटवर्कची शोध मोहिम सुरु केली आहे, त्यामुळे गुन्हेगारी जगतावर पोलिसांचा धाक निर्माण होत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT