Akola  Saam TV
महाराष्ट्र

Akola: शवविच्छेदन गृहात पैशाची मागणी केल्याने मृतदेह आणला डीन कार्यालयात

शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह अकोल्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला होता.

जयेश गावंडे

अकोला: शवविच्छेदन झालेल्या मृतदेहाची अहवेलना केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी मृतदेह थेट डीन कार्यालयात आणला. शवविच्छेदन गृहातील कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अविनाश काळे नामक युवकाचा विष प्राशन करून मृत्यू झाला होता. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह अकोल्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला होता.

दरम्यान शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह पॉलिथिनमध्ये पॅक केला जातो. मात्र यावेळी पॉलिथिनमध्ये पॅक न करता चादर मध्ये गुंडाळून दिल्याने संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट डीन कार्यालयात आणून ठेवला आहे. दरम्यान मृतदेह पॅकिंग करण्यासाठी पाचशे रुपयांची मागणी शवविच्छेदन गृहातील कर्मचाऱ्यांनी केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृतदेह डीन कार्यालयात घेऊन जात असताना येथील कर्मचारी आणि नातेवाईकांमध्येही वाद झाला. आताही मृतदेह डीन कार्यलयात ठेवण्यात आलाय.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT