Petrol Diesel News, Nashik News in Marathi, Nashik Latest Marathi News Saam TV
महाराष्ट्र

नाशकात इंधन टंचाई, ३० टक्क्यांहून अधिक पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपल्याचे बोर्ड

येत्या काळात ही इंधन टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक: राज्यात एकीकडे अनेक भागात भीषण पाणीटंचाई असताना नाशिकमध्ये मात्र नाशिककरांना इंधन टंचाईचा सामना करावा लागतोय. शहरासह जिल्ह्यातील ३० टक्क्यांहून अधिक पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपल्याचे बोर्ड लागलेत. येत्या काळात ही इंधन टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. (Nashik Latest Marathi News)

नाशिक शहर (NASHIK CITY) आणि जिल्ह्यावर सध्या इंधन टंचाईचं संकट ओढवलय. गेल्या २ ते ३ दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यातील अनेक पेट्रोलपंप पेट्रोल, डिझेल अभावी बंद ठेवण्याची वेळ पेट्रोल पंप चालकांवर आलीय. इंधन कंपन्यांनी पेट्रोल पंप चालकांसाठी असलेली क्रेडिट पॉलिसी बंद केल्याने इंधन टंचाई निर्माण झाल्याचं सांगितलं जातंय. याआधी पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल पंपावर इंधनाचे टँकर खाली झाल्यानंतर पैसे घ्यायच्या, मात्र मागील आठवड्यात केंद्राने इंधनावरील करात कपात केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी क्रेडिट पॉलिसी बंद करत पंप चालकांकडून आगाऊ पैसे दिल्यासचं इंधन पुरवठा करण्याचं धोरण अवलंबल्याने पंप चालक अडचणीत सापडलेत.

जे पंप चालक आगाऊ रक्कम जमा करतायत, त्यांनाच इंधन पुरवठा केला जातोय, तर जे पंप चालक आगाऊ पैसे भरू शकत नाही, त्यांना कंपन्यांकडून इंधन पुरवठा केला जात नाहीये. त्यामुळे अनेक पंप बंद असून काही पंप बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने नाशिककरांना मात्र इंधन संकटाचा सामना करावा लागतोय.

केंद्राने इंधनकरात कपात केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल मागे पेट्रोलियम कंपन्यांना प्रति लिटर २० ते २५ रुपयांच्या तोटा होत असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे कंपन्यांनी क्रेडिट पॉलिसी बंद करून आगाऊ पैसे भरल्याशिवाय पेट्रोल पंपाना इंधन देणं बंद केल्याने शहर आणि जिल्ह्यातील ३० टक्क्यांहून अधिक पेट्रोल पंप सध्या बंद असल्याचं चित्र आहे. यावर तोडगा न काढला गेल्यास येत्या काही दिवसांत ही इंधन टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT