Sandipan Bhumare Aurangabad Banner Saam TV
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा; शिवसैनिकांनी संदीपान भुमरेंच्या बॅनरला फासले काळे

शिवसैनिकांनी संदीपान भुमरे यांच्या बॅनरला काळे फासले

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले बंडखोर आमदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या बॅनला पुन्हा एकदा काळे फासण्यात आलं आहे. संतप्त शिवसैनिकांनी औरंगाबादमधील पैठण रोडवर लावलेल्या बॅनरला काळे फासले. विशेष बाब म्हणजे याच रस्त्यावरून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज पैठणकडे गेले. (Sandipan Bhumare Latest News)

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सध्या मराठवाड्यात शिवसंवाद यात्रेवर आहेत. काल औरंगाबाद त्यांचा संवाद कार्यक्रम झाला. यावेळी अनेक वर्षांचं 'स्वप्न' "संभाजीनगर" करता आल्यानं पूर्ण झालं याचा अभिमान आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं. उद्या रस्त्यावर दिसले तर त्यांना हात जोडून विचार गद्दार का झालात? असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं.

दरम्यान, औरंगाबादेत आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांकडून देखील जोरदार प्रतिसाद मिळाला. आज आदित्य ठाकरे पैठण दौऱ्यावर आहेत. तोच इकडे औरंगाबाद शहरात पैठणचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांच्या बॅनरवरील फोटोला संतप्त शिवसैनिकांनी काळे फासले आहे. (Aditya Thackeray Latest News)

दरम्यान, शिवसैनिकांनी भुमरे यांच्या बॅनवरील फोटोला काळे फासल्याने भुमरे समर्थक आणि मुळ शिवसैनिकांमध्ये तणाव‌ निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी सुद्धा शिवसैनिकांनी संदीपान भुमरे यांच्या बॅनरला काळे फासले होते.

संदीपान भुमरेंना मंत्रिमंडळात स्थान?

दरम्यान शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार असल्याचे सांगितले जाते. पहिल्या टप्प्यात बारा जणांचा शपथविधी होऊ शकतो यात भाजपकडून सात तर शिंदे गटाकडून पाच मंत्र्यांचा शपथ दिली होईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार संदीपान भुमरे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल. याशिवाय दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, राजेंद्र पाटील येड्रावकर या सगळ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल ही शक्यता जास्त आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

Maharashtra News Live Update: मालेगावच्या रमजान पुरा भागात ATS च्या पथकाचा छापा...

Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT