पलूसमध्ये पुरग्रस्तांच्या मागण्यांसाठी भाजपचा धडक मोर्चा; हजारो पुरग्रस्त रस्त्यावर विजय पाटील
महाराष्ट्र

पलूसमध्ये पुरग्रस्तांच्या मागण्यांसाठी भाजपचा धडक मोर्चा; हजारो पुरग्रस्त रस्त्यावर

कसल्याही प्रकारची नुकसान भरपाई किंवा मदत या पुरग्रस्ताना मिळालेली नाही.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली : नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरामध्ये पलूस तालुक्यातील अनेक गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. हा महापूर येऊन दीड महीना होऊन गेला तरी देखील शासनाने पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान, विस्थापित भत्ता, घरपडझडीचे अनुदान, घरभाडे, छोटया मोठ्या व्यापारी-व्यावसायिकांना मदत असेल वा कर्जमाफी अशा कसल्याही प्रकारची नुकसान भरपाई किंवा मदत या पुरग्रस्ताना मिळालेली नाही.(BJP's for the demands of flood victims in Palus on road)

हे देखील पहा-

पुरग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी या करता आज भारतीय जनता पार्टी पलूस (BJP Palus) तालुक्याच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आ.पृथ्वीराज देशमुख (Prithviraj Deshmukh) व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संग्राम देशमुख (Sangram Deshmukh) यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी तहसील कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला हजारोंच्या संख्येने पुरग्रस्त उपस्थित होते.

पुरग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता असे भाजपाच्या वतीने सांगण्यात आलं तसेच भाजपा पलूस च्या वतीने पुरग्रस्तांना या मोर्च्यांत सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले होते. हा धडक मोर्चा धोंडीराज महाराज मंदिरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी भाजपा पलूस शहराध्यक्ष रोहीत पाटील यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT