selfie with yuva warriors  
महाराष्ट्र

25 लाख युवा वाॅरिअर्स नेमणार; उत्तर महाराष्ट्रातून माेहिम सुरु

साम टिव्ही ब्युरो

- सागर गायकवाड

नाशिक : भारतीय जनता पक्ष अधिक बळकट करण्यासाठी 18 ते 25 वर्ष वयोगटातील युवा वॅारिअर्स जोडत आहोत. जास्ती जास्त युवकांना पक्षात येऊन कार्य करायचे आहे. भाजप पक्ष हाच युवकांच्या प्रश्न तडीस नेऊ शकताे असा विश्वास त्यांना वाटताे. युवा वाॅरिअर्स अभियानामुळे भाजप युवा मोर्चाची ताकद वाढविणार आहाेत असा विश्वास माजी ऊर्जा मंत्री, भाजपा प्रदेश सरचिटणीस तसेच भाजपा युवा मोर्चा प्रदेश प्रभारी चंद्रशखेर बावनकुळे यांनी व्यक्त केला. (bjp-yuva-morcha-warriors-nashik-chandrashekhar-bawankule-vikrant-patil-sml80)

चंद्रशेखर बावनकुळे हे आज (मंगळवार) उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक दौ-यावर आहेत. नाशिक येथे भाजपा युवा माेर्चाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी युवा वारिअर्सच्या माेहिमेचा प्रारंभ केल्याचे जाहीर केले. त्यावेळी युवा माेर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील आदी उपस्थित हाेते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले प्रत्येक मतदान केंद्र, बूथ स्तरांवर 25 युवा वाॅरिअर्स जोडणार आहाेत. उत्तर महाराष्ट्र पासून या अभियानाला प्रारंभ केला आहे. एकूण 97 हजार 641 मतदान केंद्रापर्यंत पाेहचण्याचा आमचा निर्धार आहे. त्यासाठी 25 लाख लोकांना युवा वाॅरिअर्स म्हणून नेमणार आहाेत.

नाशिक येथे 140 शाखा उघडणार आहाेत. जास्ती जास्त युवकांना पक्षात यायचे आहे त्यामुळे शहराबराेबरच नाशिक जिल्ह्यात 500 गावांत शाखा उघडणार आहे. प्रारंभी नगरसेवकांच्या संख्येनुसार आणि नंतर संपुर्ण शहरात युवा वाॅरिअसर्ची नेमणूक केली जाईल असेही बावनकुळेंनी नमूद केले.

सर्व आघाड्या युवा वाॅरिअर्ससाठी काम करणार आहेत. सेल्फी विथ युवा वाॅरिअर्स selfie with yuva warriors ही संकल्पना राबविणार आहाेत. एक जानेवारी 1997 च्या पुढच्या युवकांना युवा वारिअर्स म्हणून नेमणार आहाेत. आगामी काळातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी भाजप ताकदीने उभा राहणार असल्याचे बावनकुऴेंनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकारने ओबीसींवर अन्याय केला आहे. मी 2019 ला भुजबळ यांना जाऊन भेटलो होतो. ओबीसींच्या प्रश्नावर लक्ष घाला सांगितले आहे मात्र भुजबळ यांनी दुर्लक्ष केले. ज्येष्ठ नेते शरद पवार, काॅंग्रेसचे नेेते बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकारचे चालक आहेत. ओबीसींना आरक्षण मिळावे असे त्यांना वाटत नाही ते झारीतील शुक्राचार्य आहेत अशी टीका बावनकुळेंनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT