शासकीय कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ संतोष जोशी
महाराष्ट्र

शासकीय कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ

या गोंधळाचा व्हिडिओ आता सोशियल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड जिल्ह्य़ातील (Nanded District) कंधारमध्ये शासकीय कार्यक्रमात भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. भाजपच्या आमदाराला (MLA) कार्यक्रमाला का बोलावलं नाही म्हणून गोंधळ घालत भाजपा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. या गोंधळाचा व्हिडिओ आता सोशियल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कंधार येथे उपविभागीय कार्यालय बांधकामाच्या शासकीय भुमिपुजन कार्यक्रमास कंधार लोहाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांना बोलावले मात्र, मुखेडचे भाजपचे आमदार तुषार राठोड यांना का निमंत्रण दिलं नाही आणि इतर पदाधिकाऱ्यांना का बोलावलं नाही म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी भुमिपुजन कार्यक्रमात गोंधळ घालत निषेधाच्या घोषणा दिल्या.

यावेळी कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, आमदार श्यामसुंदर शिंदे उपस्थित होते. आमदार शिंदे यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र, भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं आमदार शिंदे यांचे कार्यकर्ते ही आक्रमक झाले या दोन्ही कडच्या कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाली दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन गोंधळाला पुर्णविराम दिला. या संपुर्ण प्रकाराचा व्हिडिओ आता सोशलमिडीयावर व्हायरल होतं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT