Chitra Wagh Saam TV
महाराष्ट्र

Chitra Wagh : संजय राठोडांच्या प्रश्नावरून चित्रा वाघ संतापल्या; नेमकं काय घडलं ?

माझी जितकी ताकद आहे, तितकी ताकद लावणार आहे. हे तुम्हाला सांगत आहे. मी कालही लढले, आजही लढले.

साम टिव्ही ब्युरो

Chitra Wagh News : भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. चित्रा वाघ यांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून पत्रकाराने चित्रा वाघ यांना माजी मंत्री संजय राठोड यांच्यावरून प्रश्न केला. संजय राठोडांवरील प्रश्न विचारताच चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या. 'या असल्या पत्रकारांना बोलावू नका, सुपारी घेऊन आम्हाला प्रश्न विचारायला येतात, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संजय राठोडांच्या प्रश्नाला प्रत्युत्तर दिलं आहे. चित्रा वाघ यांच्या उत्तरानंतर त्यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांकडून टीका केली जात आहे. (Latest Marathi news)

चित्रा वाघ या सध्या यवतमाळच्या (Yawatmal) दौऱ्यावर आहेत. यावेळी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत वाघ यांना संजय राठोडांच्या प्रकरणावरून प्रश्न विचारण्यात आला. चित्रा वाघ म्हणाल्या, 'मागच्या सरकारमध्ये संजय राठोड यांना मंत्रिपदावरून काढायला किती वेळ लागला. तुम्हाला माहीत आहे का, मी वर्षभरात काय काय सहन करावं लागलं ? मी एका मुलीसाठी लढत होती. माझी जितकी ताकद आहे, तितकी ताकद लावणार आहे. हे तुम्हाला सांगत आहे. मी कालही लढले, आजही लढले'.

'आपण ज्या प्रकारे आरोप करत आहेत, त्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही कोर्ट आहात ? तुम्ही न्याय देणार आहात का ? मी स्वत: कोर्टात गेली आहे. माझा लढा सुरू आहे, अशाही चित्रा वाघ म्हणाल्या. 'या असल्या पत्रकारांना बोलावू नका, सुपारी घेऊन आम्हाला प्रश्न विचारायला येतात, अशा शब्दात चित्रा वाघ या प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर संतापल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT