उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून कथित ध्वनीफितींनी मोठी खळबळ उडवून दिलीय. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि भाजपचा माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी याला अखेर नंदुरबार पोलिसांनी अटक केलीय. अॅट्रॉसिटी कायद्यासह वेगवेगळ्या कलमांतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आलीय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि जातीवाचक विधानं केल्याच्या आरोपाखाली विजय चौधरीला गजाआड करण्यात आलंय. मात्र चौधरी इतर काय गुन्हे दाखल झालेत..पाहूयात...
डॉ. हिना गावित, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आणि आमदार आमश्या पाडवी यांच्याशी संबंधित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे चौधरी याच्यावर कारवाई करण्यात आलीय..
व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिप्समध्ये मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, आमदार आमश्या पाडवी, राजेश पाडवी आणि अमरीश पटेल यांच्यासह इतर अनेक प्रमुख राजकीय नेत्यांशी झालेले संभाषण आहे...
यात काही नेत्यांविषयी ऑडिओ क्लिपमध्ये आक्षेपार्ह विधानं चौधरीनं केल्याचा आरोप आहे...
राज्यभरातील नेत्यांच्या तब्बल एक ते दीड हजार ऑडिओ क्लिप्स असल्याचा दावाही समोर येत आहे.
तसचं विजय चौधरी याच्याविरोधात तीन अॅट्रॉसिटीचे आणि एक विनयभंगाचा असे एकूण चार गुन्हे दाखल झाले होते...
दरम्यान चौधरीनं ऑडिओ क्लिपसंदर्भातील सर्व आरोप फेटाळून लावलेत. अटकेपूर्वी त्यानं हा दावा केलाय. तर चौधरीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी भूमिका अजितदादांच्या राष्ट्रवादीनं घेतलीय. नंदुरबारमध्ये दररोज नव्या कथित ध्वनीफिती बाहेर येत असल्याने राजकीय वातावरण चांगलचं तापलयं...आता विजय चौधरी याच्या अटकेनंतर पोलीस तपासात काय नवे सत्य समोर येतं... या प्रकरणाचे धागेधोरे कुठेपर्यंत पोहोचतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलयं...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.