श्रेयवादातून दोन नगरसेवक गट आपसात भिडले; दोघांवर गुन्हे दाखल Saam TV
महाराष्ट्र

श्रेयवादातून दोन नगरसेवक गट आपसात भिडले; दोघांवर गुन्हे दाखल

तर शिवसेनेच्या नगरसेविका सपना नवले यांचे पती अश्विन नवलें विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जयेश गावंडे

अकोला - शिवसेना वसाहतमध्ये पूरग्रस्तांना धनादेश वितरणाच्या कार्यक्रमावेळी प्रभाग क्रमांक 18 मधील शाळा क्रमांक 26 मध्ये भारतीय जनता पक्ष नगरसेवक आणि शिवसेनेच्या नगरसेविका यांच्यामध्ये वाद झाला. या वादातून दोघांनी एकमेकांविरोधात जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. भाजपचे नगरसेवक अमोल गोगे यांस ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार अटक करण्यात आली आहे. तर शिवसेनेच्या नगरसेविका सपना नवले यांचे पती अश्विन नवलें विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जुने शहरातील शिवसेना वसाहतीमध्ये अतिवृष्टीमुळे गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर महसूल प्रशासनाने सर्वेक्षण करून धनादेश वितरणाचा कार्यक्रम शाळा क्रमांक 26 मध्ये ठेवला. या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते तथा नगरसेविका सपना नवले यांचे पती यांच्यासह अविनाश गोंगलवार, नितीन गोंगलवार यांनी नगरसेवक अमोल गोगे यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतल्याचा आरोप गोगे यांनी तक्रारीत केला आहे. तर शिवसेनेचे नेते अश्विन नवले यांच्या पत्नी नगरसेविका सपना नवले यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात येऊन भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अमोल गोगे, त्याचा भाऊ नवीन गोगे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट व कलम 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे करीत आहेत. जुने शहर पोलिसांनी नगरसेवक अमोल घुगे व नितीन गुगलवर यांना अटक केली आहे.

श्रेयवादातून झाली हाणामारी

शिवसेना नगरसेविका सपना नवले आणि त्यांचे पती अश्विन नवले यांनी पूरग्रस्तांना मदत मिळावी म्हणून मोर्चे काढून आंदोलन केली. दरम्यान परिसरात सर्व्हे होऊन मदत जाहीर करण्यात आली. पूरग्रस्तांना मदतीचे वाटप सुरू असताना भाजप नगरसेवक अमोल गोगे आणि शिवसेना नगरसेवक पती अश्विन नवले यांच्या बाचाबाची झाली. याच वादातून नवले आणि गोगे गटात हाणामारी झाली. त्यामुळे हा वाद पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्याच्या श्रेयवादातून झाल्याची माहिती आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बिबट्याची दहशत, उन्हाचा तडाखा आणि गारपिटीचा कहर; मेंढपाळांवर तिहेरी संकट

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

Dandruff Home Remedy : केस धुवण्यापूर्वी करा 'हे' काम, टाळूला येणार नाही खाज अन् कोंडाही होईल गायब

SCROLL FOR NEXT