Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: कोल्हापूरनंतर शरद पवार सोलापूर मोहिमेवर! भाजप, शिंदे - अजित पवार गटाचे 'हे' नेते फुंकणार तुतारी?

Sharad Pawar News: कोल्हापूरनंतर शरद पवार यांनी आपला मोर्चा सोलापूरकडे वळवला आहे. येत्या नजीकच्या काळात महायुतीतील अनेक बडे नेते शरद पवार गटात प्रवेश करू शकतात.

Satish Kengar

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाच शरद पवारांनी महायुतीला धक्के द्यायला सुरुवात केलीय. कोल्हापूरनंतर पवारांनी आता आपला मोर्चा सोलापूरकडे वळवलाय. पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदेंचे निकटवर्तीय सुरज देशमुख आणि रावसाहेब देशमुखांना गळाला लावलंय.

एवढंच नव्हे तर आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंतांना गळाला लावण्यासाठी फिल्डिंग लावत शिंदे गटाला धक्का देण्याची योजना आखलीय. मात्र याबाबत जयंत पाटलांनी सावध प्रतिक्रीया दिलीय. शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, ''अनिल सावंतांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ.''

लोकसभा निवडणूकीवेळी धैर्यशील मोहिते पाटलांनी पवारांची तुतारी हाती घेतली. त्यातच महायुतीत विद्यमान आमदारांनाच जागा सोडण्याच्या हालचाली सुरु असल्याने महायुतीतले इतर इच्छुक नेते अस्वस्थ आहेत. त्यामुळे विधानसभेपूर्वी विजयसिंह मोहिते पाटलांनी महायुतीतील नाराजांना गळाला लावायला सुरुवात केलीय. हे नेते कोण आहेत? ते जाणून घेऊ..

'हे' नेते फुंकणार तुतारी?

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप (BJP) आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांची शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर बबन शिंदेंचा मुलगा रणजितसिंह शिंदेंनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे.

यातच भाजपचे प्रशांत परिचारक तुतारी फुंकण्याची शक्यता आहे. भाजपचे अभिजीत पाटील पवारांच्या तंबूत जाण्याची शक्यता आहे. तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंतांनीही पवारांची भेट घेतली आहे. डी एस सावंतांचा शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, लोकसभेला सोलापूरने महाविकास आघाडीला साथ दिली. तर महायुतीतील अस्वस्थांनी उमेदवारीची अनिश्चितता आणि वाऱ्याची दिशा ओळखून पवारांचे उंबरे झिजवायला सुरुवात केलीय. त्यामुळे नाराजांना हेरून पवार पक्षफुटीचा वचपा काढणार का? याची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

SCROLL FOR NEXT