Manoj Jarange  Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : 'मनोज जरांगेंनी नौटंकी बंद करावी', देवेंद्र फडणवीसांवरील आरोपांनंतर भाजप आमदाराची आक्रमक प्रतिक्रिया

Maratha Reservation Update : मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मराठा समाज आणि मला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Sandeep Gawade

Manoj Jarange News

मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मराठा समाज आणि मला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांनंतर भाजप देखील आक्रमक झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी नौटंकी आता बंद करावी, अशी टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील समाजाच्या नावाखाली स्वतःची राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मागचा बोलविता धनी कोण आहे, हे त्यांनी सांगावे. मनोज जरांगेंच्यापाठी सिल्वर ओक आहे की जालन्यातील भैय्या फॅमिली आहे. हे खरं आता लोकांसमोर यायला लागले आहे, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तुम्हाला दहावेळा सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊ नका. देवेंद्र फडणवीसांचे मराठा समाजावर अनेक उपकार आहेत. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं आहे. त्या फडणवीसांचं नाव घ्यायला तुम्हाला कोण लावतंय हे लोकांच्या लक्षात आलं आहे, असंही प्रसाद लाड यांनी म्हटलं.

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आपली खेळी संपली, त्यामुळे तुमचं दुख लक्षात येत आहे. मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठा समााला आरक्षणं दिलं आहे. त्यामुळे मराठा समाज खुश आहे. तुमच्या सल्ल्याची आता समाजाला गरज नाही, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime नवऱ्याकडून गर्भातील बाळाच्या DNA टेस्टची मागणी, ५ महिन्यांच्या गरोदर महिलेची आत्महत्या

Maharashtra News Live Update: पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते

निवृत्त DIG च्या घरावर ईडीचा छापा; तब्बल ५३ कोटींची संपत्ती जप्त

Gaurav and Akanksha: 'आम्ही वर्षभरापासून वेगळे राहतोय'; बिग बॉस विजेता गौरव खन्ना आणि आकांक्षा यांचा ९ वर्षांचा संसार मोडला

High Blood Pressure : वयाच्या 30-40 मध्येच वाढतोय BP? जाणून घ्या यामागची मोठी कारणं

SCROLL FOR NEXT