Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

अजित पवारांनी आमच्यासोबत यावं; भाजप नेत्याचं खळबळजनक विधान

पवार कुटुंबियांत कोणताही वैयक्तिक संघर्ष नाही असंही विखे पाटील म्हणाले

साम टिव्ही ब्युरो

अहमदनगर : एकीकडे राज्यात राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलं असतानाच दुसरीकडे भाजपचे (BJP) आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा भाजपमध्ये यावं असं विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. ऐन विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हे विधान केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Radhakrishna Vikhe Patil Latest News)

‘देवेंद्र फडणवीस कणखर आणि डायनॅमिक नेते आहेत, तर अजित पवार शिस्तप्रिय आणि कार्यक्षम आहेत. त्यांनी पुन्हा आमच्यासोबत लवकर येण्याचा निर्णय घ्यावा,’ असेही विखे पाटील म्हणाले. अहमदनगर येथील एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे विधान केलं आहे.

पवार कुटुंबियांत कोणताही वैयक्तिक संघर्ष नाही. आमच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत. त्यातून राजकीय मतभिन्नता आहे, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा भाजपसोबत येण्याचे निमंत्रण दिले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आता राधाकृष्ण विखे पाटलांना काय उत्तर देण्यात येईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT