Nitesh Rane, Sanjay Raut, Political News saam tv
महाराष्ट्र

Nitesh Rane On Sanjay Raut : लक्षात ठेवा, आता नऊ वाजताचा भोंगा बंद करण्याची जबाबदारी माझ्यावर; नितेश राणेंचा संजय राऊतांना सज्जड दम (पाहा व्हिडिओ)

सिंधुदूर्ग येथे माध्यमांशी बाेलताना नितेश राणेंनी राऊतांचा एकेरी उल्लेख करीत त्यांच्यावर टीका केली.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Nitesh Rane On Sanjay Raut : संजय राऊतांनी (sanjay raut) अजून राणेंना ओळखलेले नाही. राऊतांसारखी माणसं चोर बाजारात मिळतात. संजय राऊतांमुळे ठाकरे कुटुंबियांची बदनामी होते. संजय राऊतांनी यापुढे चौकटी राहावं, त्यांनी भाजप नेत्यांवर टीका केली तर मी साेडणार नाही असा सज्जड इशारा भाजप आमदार नितेश राणेंनी (nitesh rane latest news) खासदार राऊतांना दिला. सिंधुदूर्ग येथे माध्यमांशी बाेलताना नितेश राणेंनी राऊतांचा एकेरी उल्लेख करीत त्यांच्यावर टीका केली. (Maharashtra News)

नितेश राणे म्हणाले संजय राऊत यांनी भाजपच्या कोणत्याही नेत्यावर खोटा नाटा आरोप केला खालच्या पातळीवर टीका केल्यास त्यास आता मी प्रत्युत्तर देणार आहे. पक्षाने माझ्यावर ही जबाबदारी साेपवल्याचे राणेंनी नमूद केले.

ते म्हणाले राऊतांनी माझी पहिली पत्रकार परिषद आवर्जून ऐकावी आणि सेव्ह करून ठेवावी. बाळासाहेबांचे ओरिजिनल शिवसैनिक म्हणून आम्ही मोठे झालेलाे आहोत. संजय राऊत सारखा चायनीज मॉडेल आम्ही नाही.

राऊतांची लायकी नाही..

नितेश राणे म्हणाले, "शिंदे-फडणवीसांवर बोलण्याची राऊतांची लायकी नाही. भाजप नेत्यांच्या विरोधात राऊत बोलले तर आम्ही उद्धव ठाकरेंची अनेक गुपितं उघडी करु. ठाकरेंच्या सर्व गोष्टी आम्हाला माहित आहे. राऊतांनी विचार करुन भाजपवर बोलावं,"

39 वर्ष नारायण राणे शिवसेनेत बाळासाहेबांचे अत्यंत जवळचे नेते म्हणून राहिलेले आहेत. तुम्हाला वाटत असेल की ईडी, सीबीआय बीजेपीमध्ये आल्यानंतर सगळ्या कारवाया बंद करते तर तुम्ही पुराव्यांसह इकडे तिकडे मीडियात न जाता कोर्टात जावा आणि तिकडून ऑर्डर आणा असा सल्ला राणेंनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

Weather Update: पुढील ३ दिवस पावसाचे; दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भात पाऊस पडणार, 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

Girls Shirt Style: जिन्सवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट शर्ट; ऑफिस किंवा कॉलेजमध्ये दिलास सगळ्यात ग्लॅमरस

Mumbai Tourism: मुंबईकरांसाठी खुशखबर! 'गंगा आरती'चा दिव्य अनुभव घ्यायचाय? तर 'या' २ ठिकाणांना नक्कीच भेट द्या

Dog Abuse Case : विकृतीचा कळस! तरुणाचा कुत्रीवर बलात्कार, आरोपीच्या तोंडाला काळं फासलं, चपलांचा हार घालून धिंड काढली

SCROLL FOR NEXT