ncp, jayant patil, nitesh rane, saam tv
महाराष्ट्र

Nitesh Rane On NCP : तू इथं का दिसताेयस, जयंत पाटलांच्या समर्थनार्थ आंदाेलकांना गेले फाेन ? नितेश राणे

हे आंदाेलन म्हणजे धिंगाणा असल्याचे नितेश राणेंनी म्हटलं

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Nitesh Rane News : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची आज (साेमवार) ईडीकडून चौकशी (ED inquiry of Jayant Patil) केली जाणार आहे. यामुळे राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन करीत आहेत. हे आंदाेलन म्हणजे नाैटंकी असल्याची टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. (Maharashtra News)

आमदार नितेश राणे (nitesh rane) म्हणाले राष्ट्रवादी काॅंग्रेच्या कार्यकर्त्यांची नाैटंकी सुरु आहे हेच तर मी म्हणत आहे. हाच तर त्यांचा तमाशा सुरु आहे. युपीए सरकारच्या काळात पंतप्रधान नरेंद्र माेदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील चाैकशी लावल्या गेल्या. माेदी साहेब गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते चाैकशीला सामाेेरे गेले. भाजपचा एकही कार्यकर्ता रस्त्यावर उतरला नाही. धिंगाणा घातला नाही. सगळ्या चाैकशा शांततेत झाल्या.

राणे पुढं म्हणाले या लाेकांसारखी नाटकं करीत बसले नाहीत. त्यांच्या चाैकशा झाल्या की ते कामाला लागले. आज राष्ट्रावादीचे किती कार्यकर्ते मनापासून आंदाेलन छेडत आहेत हा देखील एक प्रश्न असल्याचे राणेंनी म्हटलं. किती लाेकांना फाेन आले असतील तू इथे का दिसताेय, त्यामुळे जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ आंदाेलनात उतरणा-या (NCP) कार्यकर्त्यांनी विचार करुन करावं असा सल्ला राणेंनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शासकीय वसतीगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; जेवणानंतर होऊ लागला उलट्या आणि जुलाबचा त्रास

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये शासकीय वस्तीगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा

जयंत पाटलांना मोठा धक्का; निकटवर्तीयाचं नगराध्यक्षपद रद्द, काय आहे कारण?

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

SCROLL FOR NEXT