Narayan Rane News, Sharad Pawar News, Political Crisis in Maharashtra Saam Tv
महाराष्ट्र

आमदारांच्या केसालाही धक्का लावला तर..; नारायण राणेंचा शरद पवारांना इशारा

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विटरवरुन शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधून बंडखोर आमदारांना इशारा दिला होता. बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पवारांनी दिला होता. त्यानंतर आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ट्विटरवरुन शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल, असा इशारा राणे यांनी दिला आहे. (Political Crisis in Maharashtra)

नारायण राणे यांनी ट्विटरवर पवार यांच्यावर टीका करताना म्हटलं, माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत,'सभागृहात येऊन दाखवा',ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल. आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे. त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. (Narayan Rane Latest Marathi News)

काही जणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे.नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही. तसंच राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत तुमचे (शिवसेना)किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा, असा घणाघात राणे यांनी शिवसेनेवर केला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT