Aurangabad: भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी 'बायको पाहिजे' बॅनरवर शाई फेकून बॅनर फाडला...(पहा व्हिडिओ) अविनाश कानडजे
महाराष्ट्र

Aurangabad: भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी 'बायको पाहिजे' बॅनरवर शाई फेकून बॅनर फाडला...(पहा व्हिडिओ)

निवडणुकीसाठी उमेदवार बायको पाहिजे अशा अश्यायाचे बॅनर रमेश पाटील या विवाहित तरुणाने शहरातील विविध चौकात लावले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अविनाश कानडजे

औरंगाबाद: निवडणुकीसाठी उमेदवार बायको पाहिजे अशा अश्यायाचे बॅनर रमेश पाटील या विवाहित तरुणाने शहरातील विविध चौकात लावले होते. या बॅनर वरून सकाळ पासून शहरात चर्चेला उधाण आले आहे. दुपारी संतप्त भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेट या बाजार पेठेतील बॅनरवर शाई फेक करीत बॅनर फाडला आहे. बॅनर लावणाऱ्या रमेश पाटील या तरुणांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. (BJP Mahila Aghadi activists tore his wife banner throwing ink)

पहा व्हिडिओ-

३ अपत्ये असल्याने निवडणूक (Election) लढवता येणार नाही. यामुळे निवडणूक लढवण्याकरिता बायको (Wife) पाहिजे, अशा आशयाचे बॅनर (Banner) औरगांबादच्या (Aurangabad) गुलमंडी परिसरात लावण्यात आले आहेत. हे बॅनर रमेश पाटील नावाच्या व्यक्तीने लावले आहे. औरंगाबाद महानगरपालिका (Municipal Corporation) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरची सध्या औरंगाबादमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

यामुळे निवडणूक लढवण्याकरिता बायको पाहिजे. त्यासाठी कुठलीही जातीची अट नाही. कुठल्याही जातीची महिला चालेल. वय वर्ष २५ ते ४० वयोगटामधील अविवाहीत, विधवा किंवा घटस्फोटीत महिला चालेल. पण, त्यामध् एक अट ठेवण्यात आली आहे. या महिलांना दोनच अपत्य असावी. जास्त असेल तर त्या महिलांना स्वीकारण्यात येणार नाही, असे या बॅनरवर लिहिले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT