Sanjay Kute SaamTV
महाराष्ट्र

'औकातीत राहा नाहीतर गाठ माझ्याशी'; भाजप नेत्याचा आघाडी सरकारला इशारा

'तीनच काय दहा पक्ष जरी एकत्र आले तर मी घाबरणारा नाही'

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

बुलढाणा : भाजपा आमदार संजय कुटे (BJP MLA Sanjay Kute) यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ( Shivsena, NCP, Congress ) या तीनही पक्षांना इशारा दिला आहे. जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्य़ांच्या विविध मागण्यासाठी आज भाजपा किसान आघाडी तर्फे मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी त्यानी महाविकास आघाडी सरकारने मझ्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल केले त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे असा दमच त्यांनी दिला आहे. (BJP leader warns MVA goverment)

हे देखील पहा -

यावेळी बोलताना भाजपा आमदार संजय कुटे म्हणाले की, तीनच काय दहा पक्ष जरी एकत्र आले तर मी घाबरणारा नाही, तुम्ही फक्त औकातीत रहा, पाठीमागून वार काय करता समोरून वार करा, खोट्या एट्रोसिटी किंवा महिलेच्या केसेस मध्ये माझ्या कार्यकर्त्यांना काय अडकवताय अवकातीत रहा नाहीतर गाठ माझ्याशी आहे. असा दमच यावेळी शेतकऱयांसमोर आ.संजय कुटे यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना व कार्यकर्त्यांना दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Best Anarkali Sets: गरब्यासाठी घागरा- चोळी नाही? मग आजच खरेदी करा घेरदार अनारकली सूट

Health Care: शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात 'या' ७ सवयी; आजच बदला तुमची लाइफस्टाइल

Maharashtra : शरद पवारांचं आमंत्रण अन् नरेंद्र मोदी पुन्हा बारामती दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

Shubman Gill: ‘ते काम अजून अपूर्ण आहे...’ 2027 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलचं मोठं लक्ष्य; रोहित-विराटबाबतही सांगितली मनातली गोष्ट

Maharashtra News Live Update: पिक पंचनाम्यात बाधित क्षेत्र कमी दाखवू नका; 100 टक्के नुकसान दाखवा, आमदार कैलास पाटलांची मागणी

SCROLL FOR NEXT