Sudhir Mungantiwar and Uddhav Thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

मुख्यमंत्री केवळ टीका करतात, पण...; सुधीर मुनगंटीवर यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) अमरावतीत सडकून टीका केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती : विधान परिषदेच्या १० जागांसाठी उद्या सोमवारी दिनांक २० जून रोजी मतदान होणार आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपने निवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) अमरावतीत सडकून टीका केली आहे.

'मुख्यमंत्री केवळ टीका करतात. राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावर उपाय योजना करणे हे सोडून केवळ मुख्यमंत्री केंद्रावर टीका करणे हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. आज शिवसेनेचा (Shivsena) ५६ वा वर्धापन दिवस आहे. ईश्वर त्यांना चांगले कार्य करण्याची सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना आहे', अशा शब्दात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी अग्निपथ योजनेच्या विरोधात तरुणांचे होणाऱ्या आंदोलनावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मुनगंटीवार म्हणाले, 'काँग्रेसचा देशाच्या प्रगतीमध्ये नेहमीच बाधा टाकण्यासाठी हात असतो. अग्निपथ योजनेच्या विरोधात तेल टाकण्याचे काम विरोधी पक्ष करत आहे. विरोधासाठी विरोध करायचा ही काँग्रेसची सवय आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात गैरसमज विरोधी पक्षांनी निर्माण करू नये. काँग्रेस पक्ष आता विसर्जित केला पाहिजे, ते महात्मा गांधी यांचं देखील स्वप्न होतं'.

भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा हालचाली सुरू आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, 'भाजप केव्हाही सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत नाही. महाविकास आघाडीच्या आमदारांची नार्को टेस्ट केली तर त्यांनाही सरकार नको हे स्पष्ट होईल. महाविकास आघाडी सरकर पुढचे ५०० वर्षे येणाऱ्या प्रत्येक सरकारसाठी दिशादर्शक ठरेल की माणसाने कसं वागू नये. राज्य सरकारचं चुकीच्या पद्धतीने वागत आहे. आमचं सरकार जनतेच्या आशीर्वादने २०२४ मध्ये येईल, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT