praveen darekar, bhaskar jadhav, sindhudurg, political news saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg News : तळकाेकणात राजकारण पेटलं; 'तुम्ही पुन्हा कसे निवडून येता हे आता आम्ही बघतोच'

आज कुडाळ येथे भाजपनं रॅली काढली.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

Sindhudurg News : भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांच्या सारखी प्रवृत्ती वाढली तर कोकणचं (kokan news) दुदैव म्हणावं लागेल. आता तुमचे दिवस संपले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच नेतृत्व देशातल्या लोकांनी मानलं आहे. ठोशाला ठोसा द्यायला राणेंना बरोबर माहित आहे. मात्र संविधानाला मानायचं काम राणेंनी केले असल्यानेच भास्कर जाधवांनी एवढं बोलूनही राणेंनी काही केले नाही. राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोकणचा विकास होतोय. त्याला रोखण्याचे काम भास्कर जाधव, वैभव नाईक करताहेत अशी टिप्पणी भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. (Praveen Darekar Latest Marathi News)

कुडाळ येथे आज भाजपच्या वतीने संविधान रॅली काढण्यात आली. ही रॅली आमदार वैभव नाईक यांच्या एसीबीच्या कारवाई संदर्भात पाठींबा देण्यासाठी काढण्यात आली हाेती. या रॅलीत भाजप आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, माजी खासदार निलेश राणे, प्रमाेद जठार यांच्यासह माेठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले हाेते. (Breaking Marathi News)

यावेळी प्रवीण दरेकर यांनी आमदार भास्कर जाधव यांचा समाचार घेतला. दरेकर म्हणाले वैभव नाईक (Vaibhav Naik) यांना समर्थन देण्यासाठी चिपळूणवरून नाचे आले हाेते. काही दिवसांपूर्वी शरद पवारांचा झेंडा घेतला आणि आता हे कडवट शिवसैनिक ? असा सवाल दरेकरांनी जाधवांना केला. तुम्ही पुन्हा कसे निवडून येता हे आता आम्ही बघतोच असे आव्हान देखील दरेकरांनी दिलं.

तुमची संपत्ती कशी वाढली कशी ? वैभव नाईक तुम्ही कितीही मोर्चे काढा मात्र शिंदे फडणवीस सरकार भ्रष्टाचा-यांना सोडणार नाही. तुमचा मोर्चा म्हणजे यंत्रणावर दबाव आणणारा आहे असेही दरेकरांनी नमूद केले.

संविधानाला कोणी आव्हान देणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही हे सांगण्यासाठी आजचा मोर्चा आहे असे दरेकर यांनी स्पष्ट करत केंद्रीय तपास यंत्रणा ह्या संविधानाला व घटनेला अनुसरून संस्था आहेत. तुमची अँटी करप्शन विभागाकडून चौकशी सुरू झाली म्हणून तुम्ही रस्त्यावर उतरून मोर्चा काढणार, संविधानाने दिलेल्या यंत्रणेला मानणार नाही संविधानालाच मानणार नाही ? हे सहन केल जाणार नाही असा इशारा ही दरेकरांनी वैभव नाईक आणि महाविकास आघाडीला दिला. (Maharashtra News)

तुमची अँन्टी करप्शन (acb) चौकाशी झाली त्याला सामोर जा, कर नाही त्याला डर कशाला ज्यांनी देशात आणीबाणी लावली त्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसणार आणि यांच्या चौकशा झाल्या की हे सरकार विरोधात आणीबाणीचा आरोप करणार असेही प्रविण दरेकरांनी येथे (sindhudurg) स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT