Pankaja Munde Saam tv
महाराष्ट्र

Pankaja Munde : 'चंद्रशेखर बावनकुळेंना त्रास द्यायचा ठरवलं, तर...'; पंकजा मुंडे असे का म्हणाल्या?

पंकजा मुंडे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.

विनोद जिरे

Beed News : प्रदेशाध्यक्षांना मी त्रास द्यायचा ठरवलं, तर रोज दोन- चार हजार लोक भेटतील. मात्र मी कधीही कुणाला त्रास देत नाही, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पंकजाताईला विमानात घेऊन आले. याचा त्यांना पुढील दोन महिने त्रास होईल, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा चिमटा काढला आहे. (Latest Marathi News)

पंकजा मुंडे (Pankaja Munde) सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या अंबाजोगाई येथे आयोजित मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि बीड जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते.

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, 'मी काही कधी कुणाला त्रास देत नाही. मी जर ठरवलं त्रास द्यायचं, तर तुम्हाला रोज दोन-चार हजार लोक भेटतील. हे बांधून ठेवलंय, मी त्यांना नजरेने बांधले आहे. काय मागायचं नाही,काय म्हणायचं नाही'.

'गोपीनाथ मुंडे साहेबांचे नेते अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी होते. तसेच माझे नेते नरेंद्र मोदी आणि शाह आहेत, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा राज्यातील पक्ष श्रेष्ठींना नेते मानायला तयार नसल्याचे दाखवून दिले आहे', असे मुंडे म्हणाल्या.

'बीडच्या सभेत मला कळलं नाही, की हे सुतकाला आले की मेळाव्याला. रोज मला असे मेसेज की मी जीव द्यावा'. साहेबांचे नेते अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी होते. आज आमचे नेते मोदी आणि शहा आहेत, अशाही पंकजा मुंडे म्हणाल्या.

'नरेंद्र मोदी तर जगात विक्रम करायला लागले, सगळ्यात जास्त सदस्य असलेला पक्ष भाजप त्याचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. जगात सगळ्यात जास्त लोकप्रिय नेता नरेंद्र मोदी आहे', असे त्या म्हणाल्या.

'जगात सगळ्यात जास्त मताने निवडून येणारे नेते अमित शाह आहेत. तर आम्ही हे सगळं बघतोय यात आम्ही कुठे दिसतोय का ? हे पाहतो. राजकारणात सगळ्यांना नमस्कार घालावाच लागतो. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना त्रास द्यायला जाऊ नका, अशाही पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT