nilesh rane and uddhav Thackeray,  saam tv
महाराष्ट्र

खुर्ची गेली की उद्धव ठाकरे यांची अवस्था वाईट होईल, निलेश राणेंचा घणाघात

राजकीय वर्तुळातून भाजपचे नेते शिवसेनेवर जोरदार टीका करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या जवळपास ५० समर्थक आमदारांसोबत बंड केल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. बंडखोर आमदारांनी सत्तापरिवर्तनाचा पवित्रा हातात घेतल्याने महाविकास आघाडी सरकारला (mva government) मोठा धक्का बसला आहे. शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात जोरदार सत्तासंघर्ष सुरु आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून भाजपचे नेते शिवसेनेवर टीका करत आहेत. भाजप नेते आणि खासदार (Nilesh Rane) निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यावर तोफ डागली आहे. खुर्ची गेली की उद्धव ठाकरेंची अवस्था वाईट होईल, असा घणाघात राणे यांनी ठाकरे यांच्यावर केला आहे.

यावेळी निलेश राणे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, खुर्ची गेली की उद्धव ठाकरेंची अवस्था वाईट होईल. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे नशिबाने झालेले नेते आहेत. त्यांचं स्वतःचं कर्तृत्व काहीच नाही. जे उद्धव ठाकरे सांगताहेत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरू नका, मी तर त्यांना असं आवाहन करतो की, तुम्ही ठाकरे न वापरता रस्त्यावर उतरून बघा. मग तुमची अवस्था तुम्हाला समजेल. तुमचा फोटो तरी तुमचा मुलगा वापरतो का? तुमचा मुलगा आपल्या आजोबांचा फोटो वापरतो आणि तुमचा फोटो वापरण्याएवढं आहे तरी काय? त्यामुळे तुम्ही आता तरी जमिनीवर या, अशी खरमरीत टीका माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT