Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: सचिन वाझे यांच्या आरोपांवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मी स्वतः...

Devendra Fadnavis Reaction On Sachin Waze Allegations: सचिन वाझे यांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलीय. याप्रकरणी अधिक चौकशी करू, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

Rohini Gudaghe

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये रणधुमाळी रंगली आहे. सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. तर, या प्रकरणात जयंत पाटलांचं नाव घेतल्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. वाझे यांनी याप्रकरणाची माहिती देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दिल्याचं वक्तव्य केलंय. आता याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सचिन वाझेंच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, सचिन वाझे यांनी मला पत्र पाठवलं, असं माध्यमातून मी ऐकलं (Maharashtra Politics) आहे. मी ते काही पाहिलेलं नाही. कारण मी स्वतः दोन दिवसापासून नागपुरात आहे. जे काही समोर येत आहे, त्याची चौकशी करू असं देवेंद्र फडणवीस म्हटले आहेत.

सचिन वाझेंचा आरोप काय?

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या तुरुंगात (BJP) आहेत. त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ते पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असा गंभीर आरोप केला होता. यामध्ये जयंत पाटलांचं देखील नाव घेतल्याचं वाझेंनी सांगितलं आहे. सचिन वाझेच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकाराबद्दल सर्व माहिती पत्र लिहून देवेंद्र फडणवीसांना दिली होती, अशी माहिती देखील सचिन वाझेंनी दिली होती. वाझेंच्या या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गेल्या काही दिवसांपुर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील आरोप केले होते. त्यांनी खोटं प्रतिज्ञापत्र देण्यासाठी फडणवीसांनी दबाव टाकल्याचं म्हटलं होतं, त्यानंतर आता सचिन वाझे यांनी (Sachin Waze) अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे १०० कोटी खंडणी प्रकरणात सचिन वाझे सध्या तुरूंगात आहेत. सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपामुळे या प्रकरणाला कोणती दिशा मिळते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

SCROLL FOR NEXT