vasudev kale 
महाराष्ट्र

सरकार मूकबधिर आणि संधीसाधू : वासुदेव काळे

वासुदेव काळे हे आज सांगली जिल्हा दाै-यावर आले हाेते.

विजय पाटील

सांगली sangli news : महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हे सरकार मूकबधिर आणि संधीसाधू असल्याची टीका भारतीय जनता पक्षाच्या (bjp) किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केला. काळे म्हणाले महाविकास आघाडी सरकार दोन वर्षे सत्तेवर आल्यापासून शेतकरी आणि कामगार विरोधी कार्य करीत आहे. ते सांगलीत आज (बुधवार) माध्यमांशी बोलत होते.

अतिवृष्टीग्रस्तांना तसेच वादळग्रस्तांना अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबतही बळीराजाची फसवणूक केली आहे असे काळे यांनी नमूद केले. पीक विमा कंपन्यांना फायदेशीर अटी बनवून नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित ठेवले. नैसर्गिक संकटांमुळे खचलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या भ्रष्ट , नाकर्त्या आणि कोडग्या कारभारामुळे उद्ध्वस्त केले.

सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन हेक्टरी २५ हजार , हेक्टरी ५० हजार मदत द्या अशा मागण्या करणाऱ्या उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी गत २ वर्षात राज्यातील अतिवृष्टीचा महापुराचा आणि चक्रीवादळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना किरकोळ मदत करुन शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे असेही काळे यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nalasopara: गटारावरील लोखंडी जाळीत महिलेचा पाय अडकला, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल; VIDEO

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT