Thackeray group leader joins BJP controversy Saam
महाराष्ट्र

Maharashtra Politics: बडगुजर पक्षप्रवेशासाठी मुंबईकडे रवाना; भाजपच्या दिग्गज नेत्याच्या प्रतिक्रियेनंतर सस्पेन्स वाढला

BJP entry of sudhakar badgujar: सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली असतानाच बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. स्थानिक नेत्यांचा विरोधही समोर आला आहे.

Bhagyashree Kamble

ठाकरे गटातून हकालपट्टी केल्यानंतर नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपाची वाट धरली. मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील भाजप मुख्यालयात आज त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. आज हजारो कार्यकर्त्यांसह त्यांचा ताफा मुंबईच्या दिशेनं रवाना झाला आहे. मात्र, त्यांच्या गाडीचा ताफा मुंबईत पोहोचण्याआधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चक्रावून टाकणारं विधान केलं आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सुधाकर बडगुजर यांची शिवसेनेतून केलेली हकालपट्टी आणि भाजप पक्षात जाहीर प्रवेश. हा मुद्दा प्रचंड गाजत आहे. आज आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह बडगुजर भाजपसोबत जाणार आहेत. मात्र, त्याआधीच मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती नसल्याचं सांगितलं.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना, 'सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. स्थानिक नेतृत्व, स्थानिक आमदार आणि खासदार यांचा एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कल्पना किंवा माहिती अद्याप माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही', असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला काही पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलं. 'नाशिकचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे. निवडणुकीच्या राजकारणात आपण जेव्हा एकमेकांच्या विरोधात लढतो आणि आता निवडणुकीला फक्त सहा महिने झाले आहेत. त्यामुळे विरोधाची भावना असते. परिणामी नाशिकमध्ये बडगुजर यांच्याबाबत विरोधाची भावना आहे', असं चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलं. चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या वक्तव्यामुळे बडगुजर यांचं भाजप पक्षात प्रवेश होणार की नाही, यामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमित शहांच्या दौऱ्यावरून भाजप-काँग्रेस आमने सामने

केसगळती कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल हर्बल हेअर ऑइल, कधी आणि कसं लावायचं? जाणून घ्या

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या! MACP योजनेचे नियम बदलले; 'या' कर्मचाऱ्यांना आता एक रुपयाही मिळणार नाही

Heart Attack : BP नॉर्मल असतानाही येतो हार्ट अटॅक, 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष करणे पडते महागात

Farmers Protest : मुगाला १०० टक्के हमीभाव, हजारो शेतकरी आक्रमक; ७ दिवसांचं अन्न-पाणी घेऊन ठिय्या, शाळांना सुट्टी

SCROLL FOR NEXT