Municipal staff protest after a civic chief was allegedly assaulted by a ruling corporator inside his office in Mahad. saam tv
महाराष्ट्र

शिंदेसेनेनंतर भाजप नगरसेवकाची गुंडगिरी, महाडच्या मुख्याधिकाऱ्यांना छत्रीनं मारहाण, अटकेचा फार्स आणि कायद्याचे धिंडवडे

Ruling Corporator Assaults Civic Chief Mahad: राज्यात सत्ताधारी नगरसेवकांची ठोकशाही दिवसेंदिवस वाढत चाललयं...डोंबिवलीनंतर महाडमध्येही एका सत्ताधारी नगरसेवकानं थेट मुख्याधिकाऱ्यालाच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय... राज्यात सत्ताधाऱ्यांकडूनच कायद्याचे धिंडवडे कसे काढले जात आहेत? पाहूयात...

Snehil Shivaji

सत्तेची नशा... डोक्यात गेलेली हवा... आणि अंगात संचारलेली नेतेगिरी.. ही समोर दिसणारी विदारक दृश्यं बघून महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे की गुंडांचं असा सवाल विचारायचीही आता लाज वाटू लागलीये. सत्ताधारी माजुरड्या नगरसेवकांच्या गुंडगिरीनं आता सगळ्या मर्यादा ओलांडल्यायेत. डोंबिवलीत डॉक्टरांना झालेल्या बेदम मारहाणीत नगसेवकाला बेड्या ठोकण्यापूर्वीच तिकडे रायगडमध्ये भाजपच्या एका गुंड नगरसेवकानं थेट मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून त्यांना तुडवलंय. नेमकं काय घडलं ? ऐका, खुद्द त्या हतबल मुख्याधिकाऱ्यांच्याच तोंडून...

ऐकलंत? प्रशासकीय अधिकारी धनंजय कोळेकर यांना त्याच्याच केबिनमध्ये घुसून कशा अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली. हा हल्ला करणारा दुसरा तिसरा कोणी नसून सत्ताधारी भाजपचा माजुर्डा नगरसेवक सुरज बामणे आणि त्याचे पाळीव गुंड होते. थेट मुख्याधिकाऱ्यांना मारण्यापर्यंत या नगरसेवकांची मजल जातेच कशी? यांना कायद्याचा, पोलिसांचा धाक उरलेला नाही? या हाणामारीच्या निषेधार्थ आता घाबरलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून काम बंद आंदोलन करत या गुंडांना जेलमध्ये डांबण्याची मागणी केलीये.

तर दुसरीकडे मुख्याधिकाऱ्यांनीच मारल्याचा दावा भाजप नगरसेवकानं केलाय. मात्र शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी मारहाण करणं चुकीचं असल्याचं म्हटलंय. २ दिवसांपुर्वी शिंदेगटाचे गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेंनी महिला डॉक्टरांना बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर केडीएमसी रुग्णालयातले डॉक्टर दहशतीमुळे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे या मारकुट्या नगरसेवकांचं अटक वॉरंट निघताच त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि ते थेट रुग्णालयात जाऊन बसले. आता उपचारांच्या नावाखाली हा मारकुट्या नगरसेवक हॉस्पिटलमध्ये पाहुणचार झोडतोय आणि कायद्याचे धिंडवडे काढतोय...त्यामुळे आता कोर्टानं म्हात्रेला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

माजुर्ड्या नगरसेवकांच्या गुंडगिरीने महाराष्ट्राच्या लोकशाहीची ठोकशाही करून ठेवलीये. सत्तेची नशा डोक्यात गेलेल्या या गुंडांची नशा उतरवण्यासाठी आता जुजबी कारवाई नको तर यांची थेट चौकात धिंड काढण्याची गरज आहे! महाड असो की कल्याण डोंबिवली... राज्यातला प्रत्येक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे हे मवाल्यांकडून वदवून घ्यावचं लागेल. अन्यथा जनतेचा पोलिसांवरचा विश्वास संपेल आणि कायद्यादे धिंडवडे निघतील एवढं नक्की...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संततधार पावसाचा फटका; कुनघाडा रयतवारी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शिरले पाणी

वंदे मातरमचा अपमान केला तर आता थेट जेल; संसदेत विधेयक मंजूर; कायद्यात तरतुदी काय आहेत? जाणून घ्या...

समृद्धी महामार्गावर प्रवाशांची लुटमार; बुलढाण्यातून पाच जणांच्या टोळीला अटक

Home Remedies : अळूची भाजी सोलताना हाताला खाज येते? आजीच्या बटव्यातले 'हे' उपाय नक्की ट्राय करा

भाजपच्या विरोधात शिंदेसेनेचे जोरदार आंदोलन, सत्ताधारीच एकमेकांच्या विरोधात, नगरसेवक थेट महापालिकेच्या गेटवर चढले

SCROLL FOR NEXT