devendra fadanvis ajit pawar Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : विधानसभेच्या जागांवरुन महायुतीत वादाची ठिणगी; अजित पवारांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजपची मोठी खेळी

NCP vs BJP Maharashtra Politics : अजित पवार यांनी शुक्रवारी नाशिक दौरा करत निफाड आणि कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता. त्यांच्या दौऱ्यानंतर भाजपने मोठी खेळी केली आहे.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुतीचे नेते खडबडून जागे झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्यांनी आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. मात्र, जागावाटपावरून महायुतीत वादाचे फटाके फुटत असल्याचं समोर आलंय.

शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाशिक दौरा केला. यावेळी त्यांनी निफाड तसेच कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचा आढावा देखील घेतला. महायुतीतील जागावाटपात हे दोन्ही मतदारसंघ आपल्या वाटेला येतील. त्यामुळे आतापासूनच निवडणुकीसाठी जोरदार तयारी करा, असं अजित पवार यांनी कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना सांगितलं.

यावरून भाजपचे (BJP Nashik) स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आहेत. विधानसभेत हे दोन्ही मतदारसंघ आपल्यालाच मिळायला हवे, अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेते तसेच पदाधिकाऱ्यांनी केली आहे. इतकंच नाही, तर अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर निफाड मतदारसंघात भाजपने ठराव देखील घेतला आहे.

निफाड मतदारसंघाची जागा भाजपाला मिळावी, यासाठी हा ठराव करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एकमताने ठराव मंजूर करण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीत अजितदादा गटाने या मतदारसंघातून आपल्याला मदत केली नाही, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे विधासभेच्या जागावाटपाआधीच महायुतीत वादाचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, निफाड हा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे. याठिकाणी अजित पवार गटाचे दिलीप बनकर विद्यमान आमदार आहेत. विशेष बाब म्हणजे, शुक्रवारीच अजित पवार यांनी दिलीप बनकर यांच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर दिवसभर अजित पवार कळवण-सुरगाणा मतदार संघाचा दौरा केला होता. त्यांच्या या दौऱ्यानंतर भाजपचे स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT