bjp appoints navnath padalkar incharge for baramati lok sabha constituency upcoming election  saam tv
महाराष्ट्र

Baramati Political News : सुप्रिया सुळेंना राेखण्यासाठी भाजपची नवी खेळी, सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीस ग्रीन सिग्नल (पाहा व्हिडिओ)

मंगेश कचरे

Baramati News :

भारतीय जनता पक्षाने बारामती लोकसभा मतदारसंघात (baramati lok sabha constituency) प्रभारी म्हणून नवनाथ पडळकर (Navnath Padalkar) यांच्या नावाची घोषणा केली. भाजपने बारामती मतदारसंघात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ल्यात ओबीसी चेहरा प्रभारीपदी निवडल्याने नवी रणनिती कितपत यशस्वी ठरते हे आगामी काळच सांगू शकेल. (Maharashtra News)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी बारामती लोकसभेसाठी नवी रणनीती आखली आहे. भारतीय जनता पक्षाने बारामती लोकसभा प्रभारी म्हणून नवनाथ पडळकर यांच्यावर जबाबदारी साेपवली आहे. बावनकुळेंनी महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्याची चर्चा भाजप वर्तुळात आहे.

राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पेटलेला आहे. त्यातच बारामती लोकसभा क्षेत्रातील इंदापूर येथे झालेला ओबीसी एल्गार महामेळावा राज्यभर गाजला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने नवनाथ पडळकर यांच्या रूपाने ओबीसी कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या खेळीतून भाजपने ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात हात घातला असून खासदार सुप्रिया सुळे (mp supriya sule) यांना घेरण्याची रणनीती आखल्याची चर्चा सुरु झाली आहे.

सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिल्यास ?

दरम्यान महायुतीत सुनेत्रा पवार (sunetra pawar) यांनी उमेदवारी मिळाल्यास तुम्ही त्यांचा प्रचार करणार का? या प्रश्नावर पडळकर म्हणाले या मतदारसंघात कमळाच्या चिन्हावर सुमारे पाच लाखाहून अधिक मतदार झालेल्याचे सर्वांनीच गत निवडणुकीत पाहिले आहे. आमचा महायुतीचा उमेदवार जास्ती जास्त मताधिक्यांनी निवडून यावा यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहू, मग ताे काेणत्याही चिन्हाचा का असेना असेही पडळकरांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सदस्याचे केले भरभरुन कौतुक..

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

Pune Crime : ड्रग्स, कोयते गँग, हिट अॅण्ड रन; पुणे बनलंय क्राईम कॅपिटल

Bigg Boss Marathi 5 Winner: अखेर तो क्षण आला! 'सुरज'चा गुलीगत विजय, ठरला बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विनर; मिळाले 'इतके' लाख रुपये

SCROLL FOR NEXT