Ahmednagar: रास्तारोको आंदोलन करणाऱ्या आमदार- भाजपा कार्यकर्त्यांना अटक Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar: रास्तारोको आंदोलन करणाऱ्या आमदार- भाजपा कार्यकर्त्यांना अटक

आंदोलनादरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र चर्चा मान्य न झाल्याने सकाळी 10.30 वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी 2.10 वाजेपर्यंत चालूच होते.

सचिन अगरवाल

अहमदनगर : कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात असून या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणाऱ्या आमदार मोनिका राजळे व भाजपा कार्यकर्त्यांना शेवगाव पोलिसांनी अटक केली आहे. कृषी पंपाच्या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीद्वारे शेती पंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. महावितरणच्या या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्यावतीने शेवगाव शहरातील गाडगेबाबा चौकात आज रास्ता रोको आंदोलन करण्यात येत होते.

आंदोलनादरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र चर्चा मान्य न झाल्याने सकाळी 10.30 वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी 2.10 वाजेपर्यंत चालूच होते. प्रशासनानेही आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र मागणी मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पोलिसांनी आंदोलकांना अटक करण्याचा निर्णय घेतला. आंदोलकांना अटक करून पोलिसांनी बळजबरीने पोलिस गाडीमध्ये बसवून पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्यात आल्यानंतरही आंदोलकांनी घोषणाबाजी करत पोलिस ठाण्याच्या दारातच ठिय्या दिला.रास्तारोको दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरिक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

SCROLL FOR NEXT