पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मतदारसंघाचा विकास करणार; आमदार अभिमन्यू पवारांचा संकल्प  SaamTv
महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मतदारसंघाचा विकास करणार; आमदार अभिमन्यू पवारांचा संकल्प

पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मतदारसंघात विकास करण्याचा संकल्प औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांनी वाढदिवसानिमित्त केला आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर : पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात विकास करण्याचा संकल्प औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांनी वाढदिवसानिमित्त केला आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त याकतपूर येठे 30 हेक्टर क्षेत्रात आंब्याच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार रमेश कराड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. Birthday resolution of MLA Abhimanyu Pawar

हे देखील पहा -

यावेळी बोलताना आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की, माझ्या मतदारसंघामध्ये ग्राम विकास योजनेत कृषी खात्याशी निगडित आहेत, त्या सर्व योजना कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून, शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे देखील पवार यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले, वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही संकल्प केला आहे की माझ्या मतदारसंघांमध्ये यावर्षी अडीच हजार हेक्‍टरवर आंब्याची लागवड करायची आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी ज्यापद्धतीने समृद्ध आहे त्याच पद्धतीने मतदारसंघातील शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT