Parbhani Acciden 
महाराष्ट्र

Parbhani Accident: दुचाकीवरून जाणाऱ्या जोडप्याला ट्रेलरने उडवलं; पत्नीचा मृत्यू, नवरा गंभीर जखमी

Parbhani Accident: परभणी रस्त्यावरील साई मैदानासमोर ट्रेलरने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या पत्नीचा मृत्यू झाला तर व्यक्ती गंभीर जखमी झालाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Parbhani Accident:

जिंतूर परभणी रस्त्यावरील साई मैदानासमोर ट्रेलरने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकी स्वार पती पत्नी गंभीर जखमी झाला तर पत्नीचा यात मृत्यू झालाय. जिल्हा सामान्य रुग्णालयात नेताना पत्नीचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास घडली जिंतूर शहरातील परभणी रस्त्यावर साई मैदानासमोर ट्रेलर क्रमांक एम एच ४३ यु ४३३२ च्या चालकाने ट्रेलर भरधाव आणि निष्काळजीपणे चालवत होता. त्या चालकाचं ट्रेलरवरील ताबा नियंत्रण सुटलं त्या ट्रेलरची रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकी क्रमांक एम एच ३८ वाय ६४९४ ला जोरदार धडक बसली. यात दुचाकीस्वार भानुदास नामदेव ठाकरे (वय ५१ वर्ष,)रेणुका भानुदास ठाकरे (वय ४६) दोघे रा रामेश्वर हे गंभीर जखमी झाले.

त्यांना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे सहकारी सतीश ठोंबरे,संतोष शिंदे यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर रेणुका ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत आले. परंतु रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जिंतूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय.

वाहनाचा भीषण अपघात

जैन धर्मियांचे दिगंबर पंथियाचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं रात्री वृद्धपकाळाने निधन झालं. छत्तीसगडच्या डोंगरगड इथं त्यांच निधन झालं. त्यांच्या अंत्यदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा गोंदियाच्या सालेकसा जवळील पानगाव येथे भीषण अपघात झाला. यात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

चर्चा फिस्कटली पुन्हा युद्ध पेटणार? ट्रम्पनंतर नेत्यानाहूंचाही आक्रमक पवित्रा

SCROLL FOR NEXT