Edible Oil Saam TV
महाराष्ट्र

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेलाचे दर तब्बल २० ते ४० रुपयांनी घसरले; पाहा नवे दर...

खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महागाईने होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा पुरवठा वाढल्याने त्याचा परिणाम भारतात देखील झाला आहे. त्यामुळे देशात खाद्यतेलाचे दर घसरले आहेत. 15 लिटर तेलाच्या प्रति डब्यामागे दरात 300 ते 700 रुपयांची घसरण झाली आहे. (Edible Oil Price Latest News)

याशिवाय किरकोळ बाजारातही खाद्यतेल प्रति लिटर 20 ते 40 रुपयांनी स्वस्त झाले आहे. काही दिवसांपूर्वी तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळालं होतं. मात्र, तेलाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून देखील काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

खाद्यतेलाचे दरदेखील कमी झाले असून सोयाबीन, पाम, सुर्यफूल, सरकी तेलाच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. पामतेल 170 रुपयावरुन 125 रुपये किलोवर आले आहे. सोयाबीन 180 रुपयावरून 150, खोबरेल 260 वरुन 240 व रिफाईंड किलोमागे 10 रुपये उतरले आहे. वनस्पती मात्र 180 रुपयावरुन 200 रुपयावर पोहोचले आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, एकीकडे खाद्यतेलांच्या किंमती जर कमी झाल्या असल्या तरी, इतर वस्तुंचे दर सातत्याने वाढतच आहेत. त्यामुळे नागरिक वाढत्या महागाईमुळे त्रस्त आहेत. देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असले तरी, सीएनजी, पीएनजीच्या दरात वाढ सुरूच आहे.

त्यामुळे वाहतूक खर्चात देखील मोठी वाढ झाली आहे. वाहतूक खर्च वाढल्याने सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. एलपीजी गॅस सिलिंडरच्या दराने एक हजारांचा टप्पा पार केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाडेकरूंची माहिती लपवणं पडलं महागात; पुणे शहरातील ७६ घरमालक आणि ‘पीजी’ चालकांवर गुन्हे दाखल

Maharashtra News Live Update: Dhule: अक्कलपाडा जलवाहिनीला पुन्हा मोठी गळती, लाखो लिटर पाणी वाया

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT