Maharashtra New DGP Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra New DGP: पोलिस महासंचालक रजनीश शेठ पदावरून निवृत्त, अतिरिक्त कार्यभार विवेक फणसाळकरांकडे

Maharashtra Police News: मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra New DGP:

एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता पदभार सोपवण्यात आला. पुढील आदेशापर्यंत त्यांच्याकडे हा कार्यभार राहणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यातच गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय सशस्त्र सीमा बलाच्या प्रमुख रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक होतील, अशी चर्चा होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांची निवड करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिल्याचंही बोललं जात होतं. (Latest Marathi News)

दरम्यान, रजनीश सेठ हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांचा २९ डिसेंबर १९६३ रोजी जन्म झाला. ते २५ ऑगस्ट १९८८ ला पोलीस दलात भरती झाले होते. रजनीश सेठ यांचं शिक्षण हे बीए ऑनर्स (एलएलबी) झालं. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख देखील राहिलेले आहेत.

गृह विभागाचे प्रधान सचिव, राज्याच्या कायदा आणि सुव्यस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. तसेच त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपद म्हणून देखील काम केलं. त्यांच्याकडे २०२१ मध्ये राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT