Former Minister Tanaji Sawant Son Missing  Saam tv
महाराष्ट्र

Tanaji Sawant Son Missing: मोठी बातमी! माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमानतळावरून गायब, फोनही लागेना

Former Minister Tanaji Sawant Son Missing: राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमानतळावरून गायब झाल्याची माहिती समोर आलीय. पोलिसात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली.

Bharat Jadhav

राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमानतळावरून गायब झाल्याची माहिती समोर आली. पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमला कॉल आला होता. माजी आरोग्यमंत्र्यांकडून पोलीस यंत्रणेला विचारणा सुरू आहे. दुपारी ड्रायव्हरला विमानतळावर सोडायला लावलं होतं, त्यानंतर त्या ठिकाणाहून मुलगा गायब झाल्याची माहिती आहे. माजी आरोग्य मंत्री विमानतळावर दाखल झाले आहेत. आता हाती आलेल्या माहितीनुसार, ऋतुराज सावंत सुखरूप असल्याचं म्हटलं जात आहे.

ऋतुराज तानाजी सावंत (वय ३५) आज दुपारी पुणे विमानतळावरून गायब झालाय. माजी मंत्र्यांकडून पोलिसात अपहरण झाल्याची तक्रार नोंदवण्यात आलीय. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नऱ्हे परिसरातून स्विफ्ट गाडीतून त्याचे अपहरण करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन व्यक्तींनी ऋतुराज सावंत याचे अपहरण केल्याचं सांगितलं जात आहे. सहकारनगर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunetra Pawar : सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं, आई एकविरा चरणी राष्ट्रवादीच्या आमदाराचं साकडं

8th Pay Commission: २०२६ की २०२७; कधी होणार आठवा वेतन आयोग लागू? केंद्र सरकारने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंपासमोर ३ ते ४ किलोमीटरच्या रांगा

Mumbai : डोकं रिक्षावर आपटलं, फरफडत नेलं; ४ वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण, वसईचा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल!

भोंदू बाबा अशोक खरातवर शिर्डीत गुन्हा दाखल; 4 एकर भूखंड बळकावला|VIDEO

SCROLL FOR NEXT