परळीत 'या' बड्या नेत्याच्या कारने घेतला निष्पाप बळी! विनोद जिरे
महाराष्ट्र

परळीत 'या' बड्या नेत्याच्या कारने घेतला निष्पाप बळी!

संबंधितांवर गुन्हा दाखल करा ही मागणी घेऊन नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या..

विनोद जिरे

बीड - परळी शहरापासून काही अंतरावर असलेल्या तळेगाव परिसरात, किंगमेकर नाव असणाऱ्या अलिशान कारने, दुचाकीस्वारास चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये दुचाकीस्वार प्रमोद भगवान तांदळे या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुचाकीला धडक दिलेली आलिशान कार ही परळी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षच्या मुलाची असल्याची चर्चा शहरात आहे. काही दिवसापूर्वीच या पोराच्या वाढदिवसानिमित्त, बापाने लाखो रुपयांची ही आलिशान कार घेऊन दिली होती.

तीच कार दारू पिऊन चालवणाऱ्या पोराने, एका निष्पाप युवकाचा जीव घेतला असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. यामुळे या कारचालकावर तात्काळ गुन्हा दाखल करुन आम्हाला न्याय देण्यात यावा. ही मागणी घेऊन परळीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर, मयत प्रमोद तांदळे यांच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान परळी पोलीस त्या राजकीय व्यक्तीच्या मुलावर गुन्हा दाखल करणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

April 1 Rule: LPG, टॅक्स, PAN आणि रेल्वे...! 1 एप्रिलपासून होणार मोठे बदल, नव्या नियमांमुळे खिशाला लागणार कात्री

Kalamkari Saree Designs: डेली वेअरसाठी बेस्ट कलमकारी साड्यांचे लेटेस्ट 5 पॅटर्न

Maharashtra Live News Update: सातारा शहर आणि परिसराला वळीव पावसाचा तडाखा

Pune Picnic Spot : पुण्याजवळील 'हे' ठिकाण जणू स्वर्गच, मिळेल बोटिंग अन् फोटोग्राफीचा अनोखा अनुभव

RR vs CSK Match Rain : राजस्थान-चेन्नई सामन्यात पाऊस ठरला व्हिलन; टॉस उडवण्याआधीच जोरदार एन्ट्री, मॅच रद्द होणार का?

SCROLL FOR NEXT