Sharad Pawar news Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत बड्या नेत्याने साथ सोडली, 'घड्याळ' हाती बांधलं

Maharashtra Political News : सोलापुरात शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. सोलापुरातील नेत्याने ऐन निवडणुकीत शरद पवारांची साथ सोडली आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापुरात शरद पवारांना मोठा धक्का

शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात प्रवेश

सोलापुरात अजित पवारांची ताकद वाढण्याची शक्यता

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व सत्ताधारी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केलीये. निवडणुकीमुळे नेत्यांकडून राजीनाम्यांची मालिका देखील सुरू आहे. या राजीनाम्यामुळे निवडणुकीतील समीकरण बदलताना दिसत आहे. सोलापूरातही बड्या नेत्याने शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

सोलापुरातील या नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने अजित पवारांची ताकद वाढल्याचे बोललं जात आहे. सोलापूरातही एका बड्या नेत्याने शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात प्रवेश केला आहे. या नेत्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवेशामुळे सोलापुरात अजित पवारांची ताकद आणखी वाढल्याचे बोललं जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिलेल्या सुधीर खरटमल यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुधीर खरटमल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

सुधीर खरटमल यांनी आजच राजीनामा शरद पवार गटाला दिला आहे. राजीनामा पत्र देऊन थेट मुंबईतील अजित पवारांच्या बैठकीला उपस्थिती लावली. या बैठकीतच सुधीर खरटमल यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापूर शहरातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अहिल्यानगरमध्ये अजित पवारांना धक्का

दुसरीकडे अहिल्यानगरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहे. एकनाथ शिंदे यांची पारनेरमध्ये जाहीर सभा आहे. या सभेत झावरे शिंदे गटात प्रवेश करतील. सुजित झावरे यांनी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना साथ दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुछ बडा होने वाला है! भाजप ३ राज्यातील मुख्यमंत्र्यांना CM पदावरून हटवणार; माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

कृषी दिनी राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे वितरण; १८९ शेतकरी, संस्था व कृषी अधिकाऱ्यांचा होणार सन्मान

प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याची हत्या, लोहगडावर फिरायला नेऊन केतन अग्रवालचा घात

Maharashtra Politics: ऑपरेशन टायगरनंतर 'ऑपरेशन बीएमसी' खासदारांनंतर आता नगरसेवकही फुटणार?

Maharashtra News Live Update: पुण्यात गुजरातमधून विक्रीसाठी आणलेला गुटखा जप्त

SCROLL FOR NEXT