Bachchu Kadu Saam TV
महाराष्ट्र

Bachchu Kadu News : बच्चू कडूंना मोठा धक्का; चांदूरबाजार निवडणुकीत पॅनेलचा उडाला धुव्वा, काँग्रेसचा विजय

Bachchu Kadu News : अपक्ष आमदार बच्चू कडू यांना पराभवाचा एक मोठा धक्का बसला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे, साम टीव्ही

ChandurBazar News: अपक्ष आमदार बच्चू कडू यांना पराभवाचा एक मोठा धक्का बसला आहे. चांदूरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या निवडणुकीत बच्चू कडू यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या पॅनलने बाजी मारली असून बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात १५ पैकी १२ जागांवर विजय मिळवला आहे. (Latest Marathi News)

चांदूरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या १५ संचालकपदासाठी १९ मार्चला मतदान प्रक्रिया पार पडली. तर सोमवारी (२० मार्च) मतमोजणी झाली. काँग्रेस आणि प्रहारने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत बच्चू कडू यांच्या पॅनलला केवळ ३ जागा जिंकता आल्या.

गृह तालुक्यातील खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत प्रहारच्या पॅनलचा पराभव झाल्याने बच्चू कडू यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, विजयानंतर विरोधकांनी ५० खोके एकदम ओकेच्या घोषणाही दिल्या. या निवडणुकीत विविध मतदान केंद्रावर प्रहार व सहकार पॅनलच्या उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. (Maharashtra Breaking News)

मात्र, तळवेल केंद्रावर बबलू देशमुखच्या गटाला १० टक्के मते प्राप्त झाल्याने हा विजय सुकर झाला. बहुतांश ठिकाणी सहकार व शेतकरी पॅनलमध्ये जयपराजयासाठी एका मताचा फरक होता. बबलू देशमुख यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलचे १२ संचालक विजयी झाले. तर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या शेतकरी पॅनलचे फक्त तीन संचालक निवडून आले.

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच अटीतटीच्या लढत पाहायला मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, आर. व्ही. भुयार यांनी निवडणूकीचा निकाल जाहीर केला. सहायक निबंधक एस.टी.केदार यांच्या नेतृत्त्वात सहकार विभागाच्या एकूण ३१ कर्मचाऱ्यांनी मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली. मतमोजणी च्या दिवशी पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT