Raj Thackeray MNS candidate Akbar Sonawala saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

MNS vs Uddhav Thackeray Group : ऐन निवडणुकीच्या प्रचारधुमाळीत राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. नांदगाव मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अकबर सोनावला यांनी माघार घेतली असून, ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

Nandkumar Joshi

अजय सोनावणे, मनमाड

निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसा ज्वर वाढत चालला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती असा थेट सामना रंगणार असला तरी, मनसेनेही आपले शेकडो शिलेदार रिंगणात उतरवले आहेत. राज्यात सत्तेत येणार असल्याचा दावा नेत्यांपासून कार्यकर्ते करत आहेत. पण दुसरीकडे याच मनसेला नांदगावमध्ये मोठा धक्का बसला आहे. येथील मनसेचा शिलेदार म्हणजेच उमेदवारानंच ऐन राजकीय धुमाळीत निवडणुकीतून माघार घेतली आहे. या उमेदवारानं थेट ठाकरे गटातच प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणुकीचं (Maharashtra Election) रण प्रचंड तापलं आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप, टीकेच्या तोफा डागल्या जात आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर पहिल्यांदाच यंदाची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट होणार आहे. त्यात राज ठाकरेंची मनसेही तितक्याच ताकदीने उतरली असल्यानं रंगत आणखी वाढली आहे. मनसेने शंभराहून अधिक उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत असताना काही ठिकाणी, विशेषतः मुंबईत मनसे विरुद्ध ठाकरे गटात सामना होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी टीकेच्या तोफा धडाडत आहेत. त्याचवेळी नांदगावमध्ये मनसेला ठाकरे गटानेच मोठा धक्का दिला आहे. नांदगावचे मनसेचे उमेदवार अकबर सोनावला यांनीच निवडणुकीत माघार घेतली आहे. त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करत, उमेदवार गणेश धात्रक यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

नांदगावच्या आखाड्यात ट्विस्ट

नांदगाव-मनमाड विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला. मनसेचे उमेदवार अकबर सोनावला यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत थेट ठाकरे गटात प्रवेश केला. हा मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.

अकबर सोनावला यांच्या पत्नी सबिया या मनसेच्या नगरसेविका होत्या. या मतदारसंघात मनसेची मोठी ताकद नसली तरी, बऱ्यापैकी समर्थक आहेत. पण सोनावला यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळं ठाकरे गटाला नांदगावमध्ये फायदा होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT