महाराष्ट्र

Aurangabad News: ग्रामपंचायत आहे की IPL टीम! सरपंच, उपसरपंच पदासाठी लाखोंची बोली; आकडे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

औरंगाबाद जिल्ह्यातील शेलुद गावात ग्रामपंचायतीत लिलावाचा हा सगळा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : आयपीएल सुरु होण्यासाठी लिलाव पार पडतात. या लिलाव प्रत्येक संघ खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी लाखो कोटींच्या बोली लावतात. खेळाडू जितका मोठा तितकी बोली मोठी, असं एकंदर त्या लिलावाचं चित्र असतं. असंच काहीसं औरंगाबादेत घडलं आहे. मात्र क्रिकेटचा येथे काहीच संबंध नव्हता. येथे लिलाव ग्रामपंचायचीचा होत होता.

मतदारांच्या मताच्या अधिकारातून निवडून दिलेल्या उमेदरांकडून सरपंच, उपसरपंच अशा पदासाठी पैशांची उधळण सुरु होती. ही एकप्रकारे लोकशाहीची थट्टाच आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शेलुद गावात ग्रामपंचायतीत लिलावाचा हा सगळा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

पैशाची बोली लावून सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची पदे विकल्याचं समोर आलं आहे. सरपंच पद साडेचौदा लाखात (१४.५० लाख) तर उपसरपंच पद 4 लाखात विकले गेले. 70 हजारांपासून 2 लाखापर्यंत बोली लागली. गावाच्या मंदिरासमोर ग्रामसभा बोलवून ग्रामपंचायत पदांचा लिलाव झाला.

सरकार दरबारी मात्र ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्याचा बनाव केल्याचा आरोप होत आहे. सरपंचपदी निवडून आलेल्या सरपंच पतीने मात्र लिलावाचा इन्कार केला आहे. गावातील नागरिकांनी लिलावाची जाहीर कबुली दिली आहे.

शकुंतला योगेश ससेमहल असं साडे चौदा लाख रुपये देऊन सरपंचपदी निवडून आलेल्या महिलेचे नाव आहे. राजू म्हस्के असं 4 लाख रुपये भरून उपसरपंच झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मात्र लिलाव न पटल्यामुळे राजीनामा देऊन राजू म्हस्के या उपसरपंचाने हा सगळा प्रकार उघड केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT