Pune - Bhusaval Train saam tv
महाराष्ट्र

Pune- Bhusaval Train Cancelled : आजपासून तब्बल दाेन महिने भुसावळ- पुणे रेल्वे रद्द; जाणून घ्या कारण

प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

साम न्यूज नेटवर्क

- अजय सोनवणे

Pune - Bhusaval Train : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कर्जत स्थानकाच्या रीमॉडेलिंग कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे भुसावळ-पुणे-भुसावळ (हुतात्मा एक्सप्रेस) (Bhusaval - Pune - Bhusaval Train) ही रेल्वे आजपासून (शनिवार) पुढील दोन महिने रद्द करण्यात आली आहे.

याबाबत रेल्वे प्रशासनाने प्रसिध्दीपत्राद्रवारे माहिती दिली आहे. या पत्रकात मुंबई रेल्वे विभागातील कर्जत स्थानकांवर यार्ड रिमॉडेलिंगचे काम होत असल्याने २८ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान पुणे - भुसावळ व २९ जानेवारी ते १ एप्रिल दरम्यान भुसावळ - पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याचे म्हटले आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. दरम्यान ही रेल्वे तब्बल दाेन महिने बंद राहणार असल्याने नाशिक (nashik) जिल्ह्यासह खानदेशातील प्रवाशांची (passengers) मोठी गैरसोय होणार आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Better sleep tips: रात्री शांत झोप हवीये? मग झोपण्यापूर्वी हे काम नक्की करा

Maharashtra News Live Update: महिला अत्याचाराच्या दाखल २ गुन्ह्यात अशोक खरातविरोधात न्यायालयात चार्जशीट

Crime News : लग्नानंतर ६० दिवसांत नवविवाहित तरुणीचा संशयास्पद मृत्यू; तपासात उघड झालं चक्रावणारं सत्य

Weight Loss : वजन राहील कंट्रोलमध्ये अन् चेहराही करेल ग्लो, रोज नाश्त्यासोबत प्या 'ही' २ मिनिटांत बनणारी स्मूदी

Women Schemes In Maharashtra: महिलांसाठी आर्थिक वरदान ठरणार! 'या' ५ सरकारी योजना लाडकीला जबरदस्त लाभ मिळवून देणार, अर्ज कसा करायचा?

SCROLL FOR NEXT