Bhiwandi News Saam TV
महाराष्ट्र

Bhiwandi News : शोरूमच्या भिंतीला भगदाड पाडून १५ लाखांचे मोबाइल पळवले; चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Bhiwandi Crime News : मोबाइलसह इलेक्ट्रॉनिक्स साहित्यांची विक्री करणाऱ्या शोरूमच्या भिंतीला भगदाड पाडून १५ लाखांचे मोबाइल लंपास केल्याची धक्कादायक घटना भिवंडीच्या कोनगाव परिसरात घडली.

Satish Daud

फैयाज शेख, साम टीव्ही

मोबाइलसह इलेक्ट्रॉनिक्स साहित्यांची विक्री करणाऱ्या शोरूमच्या भिंतीला भगदाड पाडून १५ लाखांचे मोबाइल लंपास केल्याची धक्कादायक घटना भिवंडीच्या कोनगाव परिसरात घडली. चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल ताराचंद परदेशी (वय ३४) यांचे कल्याण-भिवंडी (Bhiwandi-Kalyan Highway) मार्गावर असलेल्या कोनगावातील साई रेसिडेन्सी इमारतीत मोबाइलसह इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्रीचे शोरूम आहे. २७ जुलैच्या रात्री अमोल हे परदेशी नेहमीप्रमाणे शोरूम बंद करून घरी निघून गेले.

त्यानंतर २८ जुलै रोजीच्या पहाटेच्या सुमारास चार ते पाच चोरट्यांनी शोरूमच्या भितीला भगदाड पाडून १५ लाख रुपये किमतीचे मोबाइल आणि इतर साहित्य लंपास केले. चोरी करण्यासाठी चोरट्यांनी (Crime News) लगतच पत्र्याचे कंपाऊंड असल्याने त्याचा आडोसा घेतला. त्यानंतर शोरूमच्या भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला.

विशेष म्हणजे कल्याण-भिवंडी मार्गावर २४ तास रहदारी असते. तरी देखील चोरटे भिंत फोडून शोरूममध्ये चोरी करत असताना कुणालाही कसे दिसून आले नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान, चोरीचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Crime: महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आरोपी पोलिसाचा थाट, मिळतेय VIP ट्रिटमेंट; राजेश जाधवचा नवा VIDEO समोर

Maharashtra Live News Update : सावंतवाडी, दोडामार्गमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

Cotton Saree Blouse Patterns: कॉटनच्या साडीवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, नक्की ट्राय करा

Tomato Facepack For Glowing Skin: चेहऱ्यावर हवीय गुलाबी चमक? मग 'या' पद्धतीने लावा टोमॅटोचा फेस पॅक

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; दोन बड्या नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा, अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT