Bhiwandi Fire Saam tv
महाराष्ट्र

Bhiwandi Fire : परफ्यूम गोदामाला भीषण आग; तीन कंपन्यांचे नुकसान, भिवंडीत आगीचे सत्र सुरू

Bhiwandi News : परंतु आगीच्या धुराचे लोट तब्बल दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरून दिसत आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी पाच तास उलटूनही आग आटोक्यात आलेली नाही

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
भिवंडी
: मुंबई- नाशिक महामार्गालगत भिवंडी तालुक्यातील येवई गावच्या हद्दीत आर. के. लॉजिस्टिक गोदाम संकुलात पहाटे चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या भीषण आगीत तीन कंपन्यांची गोदामे जळून खाक झाली आहेत. आग मोठ्या प्रमाणात पसरली असून त्यावर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु असून आगीमुळे कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

भिवंडी तालुक्यातील येवई या गावालगत असलेल्या बॅकारोझ परफ्युम्स अँड ब्युटी प्रोडक्ट्स प्रा. ली., इंटरक्राफ्ट ट्रेडिंग प्रा.ली. आणि फ्रेगरन्स शॉप प्रा. ली. या तीन कंपन्यांच्या गोदामांना पहाटेच्या सुमारास आग लागली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

आग विझविण्यात लागू शकतो बारा तासांचा काळ 

आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु आगीच्या धुराचे लोट तब्बल दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरून दिसत आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी पाच तास उलटूनही आग आटोक्यात आलेली नाही. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी अजूनही दहा ते बारा तासाचा वेळ लागू शकतो किती वेळ लागेल हे अजूनही सांगता येत नाही. 

आगीत मोठे नुकसान 

पहाटेच्या सुमारास परफ्यूमच्या गोदामाला सुरवातीला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर आजूबाजूच्या तीन गोदामात आग पसरली. यामुळे आगीचे मोठे लोट परिसरात दिसू लागले होते. दरम्यान या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले असून यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आग आटोक्यात आल्यानंतरच नुकसानीची आकडेवारी समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT