Bhima Sahakari Sakhar Karkhana Election : saam tv
महाराष्ट्र

Bhima Sahakari Sakhar Karkhana Election : 'भीमा' वरुन सतेज पाटलांवर धनंजय महाडकांचा गंभीर आराेप

येत्या 13 नोव्हेंबरला कारखान्याची निवडणूक होणार आहे.

भारत नागणे

Bhima Sahakari Sakhar Karkhana Election : पंढरपूर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. यंदा प्रचारात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. या कारखान्याचे अध्यक्ष भाजपचे खासदार धनंजय महाडीक (dhananjay mahadik) व माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील (satej patil) हे कट्टर विरोधक या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. (Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Latest Marathi News)

येत्या 13 नोव्हेंबर रोजी कारखान्याची निवडणूक होणार आहे. त्यासाठी नेत्यांकडून प्रचार सुरु आहे. पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील‌ प्रचार सभेत खासदार महाडिक यांनी थेट माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील (satej patil) यांच्यावर हल्लाबोल करत सतेज पाटील यांनी भीमा कारखाना बंद पाडण्यासाठी विरोधकांना हाताशी धरल्याचा गंभीर आरोप केला आहे.

आमदार सतेज पाटील यांचा भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत काडीमात्र संबंध नाही. तरीही महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी कारखान्याच्या विरोधात अनेक तक्रारी केल्या. कारखान्याला कर्ज मिळू नये म्हणून पत्रं दिली.

त्यानंतर आता कारखाना बंद पडावा‌ यासाठी त्यांनी पंढरपूर (pandharpur) आणि मोहोळ (mohol) तालुक्यातील विरोधकांना हाताशी धरले आहे. परंतु कारखान्याचे सभासद त्यांचा डाव उधळू लावतील असा विश्वास खासदार महाडिक यांनी प्रचारात म्हटलं. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT