Raj Thackeray Aurangabad sabha latest Marathi news Saam Tv
महाराष्ट्र

Raj Thackeray Aurangabad Sabha: '...तर राज ठाकरेंची सभा उधळून लावणार'

येत्या एक मे राेजी राज ठाकरे यांची औरंगाबादला सभा हाेणार आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांची येत्या एक मे राेजी औरंगाबाद (aurangabad) येथे हाेणारी सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीने (bhim army) येथे (solapur) दिलेला आहे. हा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशाेक कांबळे यांनी येथे दिला आहे. (Raj Thackeray Aurangabad sabha latest Marathi news)

राज ठाकरेंनी भोंग्यावर घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वत्र वातावरण तापलं आहे. त्यांच्यामुळे सामाजिक वातावरण बिघडत चालले आहे असे विविध राजकीय पक्षातील नेते मंडळी बाेलू लागली आहे. गुढी पाडव्यानंतर आता राज ठाकरेंची महाराष्ट्र दिनी औरंगाबादला सभा (Raj Thackeray Aurangabad Sabha Latest Updates) हाेत आहे. या सभेसाठी पोलीस प्रशासनाने ठाकरेंना १६ अटी घालून दिलेल्या आहेत.

दरम्यान या अटींचे उल्लंघन राज ठाकरेंकडून सभेत झाले तर आम्ही सभेतच छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (dr babasaheb ambedkar) आणि महात्मा फुलेंच्या (mahatma phule) घोषणा देऊन सभा बंद पाडू असा इशारा भीम आर्मीने दिला आहे. भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे म्हणाले संपूर्ण महाराष्ट्रातून भीम आर्मीचे कार्यकर्ते हे राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला जाणार आहेत. तेथे त्यांनी अटी पाळल्या नाहीत असे दिसून आले तर आम्ही सभा बंद पाडणार.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somwar che Upay: सोमवारी रूद्राक्षाचे करा 'हे' उपाय; यशाच्या शिखरावर पोहोचायला वेळ लागणार नाही

Ration Card KYC: मोठी बातमी! महाराष्ट्रातील तब्बल १,५०,००० रेशन कॉर्ड बंद, मिळणार नाही धान्य; तुमचंही नाव आहे का?

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

BEST Election : ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट, भाजपविरोधात आज मैदानात, कोण जिंकणार निवडणूक?

GST Reforms: खुशखबर! कार आणि बाईकच्या किंमती कमी होणार? जाणून घ्या केंद्र सरकारची मोठी योजना

SCROLL FOR NEXT