Bhim Army Arrest Saam Tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Bhim Army : राज ठाकरेंची सभा बंद पाडू, असा इशारा भीम आर्मीने सोलापुरात दिला होता.

साम टिव्ही ब्युरो

घाटकोपर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray यांची औरंगाबादमध्ये (Aurangabad) जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी सुरू असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अशातच राज ठाकरे यांची ही सभा बंद पाडू असा इशारा भीम आर्मीने दिला होता. त्यासाठी भीम आर्मीचे (Bhim Army) कार्यकर्ते औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र घाटकोपर (Ghatkopar) येथून जात असताना पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेसाठी पोलीस प्रशासनाने (Aurangabad Police) ठाकरेंना 16 अटी-शर्ती घालून परवानगी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या 16 अटींचे उल्लंघन राज ठाकरेंकडून सभेत झाले तर आम्ही सभेतच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या घोषणा देऊन राज ठाकरेंची सभा बंद पाडू, असा इशारा भीम आर्मीने सोलापुरात दिला होता.

या इशाऱ्यावर आपण ठाम असल्याचं सांगत आज (रविवारी) भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र सोलापुरवरून औरंगाबादकडे येत असताना त्यांना वाटेतच घाटकोपर येथे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांच्या सभेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT