Mira Bhayandar News Saam tv
महाराष्ट्र

Mira Bhayandar News: केस बारीक केल्याने १३ वर्षीय मुलाने उचलले टोकाचे पाऊल; १६ व्या मजल्यावर बाथरूममध्ये गेला अन् ...

केस बारीक केल्‍याने १३ वर्षीय मुलाचे धक्‍कादायक पाऊल

चेतन इंगळे

भाईंदर : केस बारीक कापले म्हणून संतप्त झालेल्या १३ वर्षीय मुलाने इमारतीच्या १६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना (Bhayandar) भाईंदरमध्ये मंगळवारी रात्रीच्‍या सुमारास घडली आहे. (Live Marathi News)

भाईंदर पुर्वेला न्यू गोल्डन परिसरात सोनम इंद्रप्रस्थ इमारतीच्या १६ मजल्यावर पाठक कुटुंब राहते. कुटुंबातील आठवीत शिकणारा शत्रुघ्न राजीव पाठक ह्या १३ वर्षांच्या मुलास त्याच्या सख्ख्या चुलत भावाने केस कापण्यास नेले होते. परंतु केस बारीक कापल्याने तो रागावला. घरातल्यानी समजूत काढली. मात्र ती अपयशी ठरली.

बाथरूममध्‍ये गेला अन्‌

मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास शत्रुघ्नने बाथरूममधील छोट्याश्या खिडकीतुन खाली उडी मारून आत्महत्या केली. शत्रुघ्न हा पाठक यांचा सर्वात लहान मुलगा होता. त्याला दोन मोठ्या बहिणी आहेत. सर्वात लहान असल्याने तो सर्वांचा लाडका होता. दरम्यान नवघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पालवे करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर

Maharashtra News Live Update: पंढरपूर कॉरीडोर बाधित लोकांसाठी विशेष पुनर्वसन धोरण मंजूर

Weather Update: मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

CNG Price Today : CNG च्या दरात मोठी वाढ, मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा झळ; आजचे ताजे दर काय? वाचा

गणेशोत्सवात गौतमीच्या कार्यक्रमाला विरोध; 'धार्मिक कार्यक्रमात गौतमीचा धांगडधिंगा कशाला?'

SCROLL FOR NEXT