Raj Thackeray Uddhav Thackeray alliance Saam Tv News
महाराष्ट्र

Uddhav Thackeray & Raj Thackeray : भावांना पाझर फुटला असेल तर...; राज-उद्धव ठाकरेंच्या संभाव्य युतीवर शिंदेसेनेची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray & Raj Thackeray Alliance : राज ठाकरेंनी टाळीसाठी हात पुढे केलेला असताना उद्धव ठाकरे यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आता होऊ लागल्या आहेत.

Prashant Patil

मुंबई : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची धूळधाण झाल्यानंतर आता ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची भाषा केली आहे. महाराष्ट्राच्या हितापुढे आमची भांडणं, वाद क्षुल्लक असल्याचं राज ठाकरे एका मुलाखतीत म्हणाले. राज यांनी साद घातल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मी सोबत येण्यास तयार आहे. माझ्याकडून सगळी भांडणं मिटली. पण माझी एक अट आहे. माझ्यासोबत येऊन हित आहे की भाजपसोबत जाऊन हित आहे, ते आधी ठरवा, असं उद्धव ठाकरे कामगार सेनेच्या मेळाव्यात म्हणाले.

राज ठाकरेंनी टाळीसाठी हात पुढे केलेला असताना उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आता रंगू लागल्या आहेत. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया आली आहे. राज आणि उद्धव यांची विधानं मी ऐकलेली नाहीत. मी दौऱ्यावर असल्याने त्यांची विधानं ऐकू शकलो नाही. पण राजकारणात काहीही घडू शकतं. सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल आणि दुपारचा माणूस संध्याकाळी कुठं असेल. त्याचं काही सांगता येत नाही, असं शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही भाऊ-भाऊ आहेत. त्यांना जर पाझर फुटला असेल एकमेकांसाठी तर आम्हाला त्यातलं काय माहीत नाही. आम्ही महायुतीचं काम करतोय. महायुती भक्कम झालेली आहे. महायुतीला आता कोणी छेद देऊ शकत नाही. दोघे एकत्र येण्याबद्दल बोलत असतील तर आम्हाला त्यात कोणतीच अडचण नाही. आम्ही आमचं काम करतोय. आमच्या कामाच्या जोरावरच सत्ता परत आलेली आहे. आम्ही इतक्या वेगानं पुढे गेलोय की आता महायुतीला रोखणं कठीण आहे, असं मंत्री भरत गोगावले म्हणाले.

राज आणि उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येत आहेत का? त्यांची युती झाल्यास तुमच्या पक्षाचा तोटा होईल का? असे प्रश्न गोगावलेंना विचारले गेले. त्यावर आम्हाला तोटा होण्याची शक्यता वाटत नाही. कारण एकनाथ शिंदेंनी मुंबईतील उबाठा बऱ्यापैकी रिकामी केली आहे. राहिलेले देखील येण्याच्या तयारीत आहेत. शिंदेंचं मिशन सुरु आहे. त्यामुळे काही अडचण होणार नाही, असंही गोगावले म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT