Bhandara  अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

दारुच्या नशेत ग्रामसेवक खुर्चीवरच लोळले; साकोली तालुक्यातील धक्कादायक प्रकार...(पहा Video)

भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील विरसी ग्रामपंचायतीमधील प्रकार आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा: ग्रामपंचायतीच्या नियोजित सभेत ग्रामसेवक दारुच्या नशेत खुर्चीवरच लोळल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील विरसी ग्रामपंचायतीमध्ये घडला आहे. सभेत ग्रामसेवक दारुच्या नशेत बेशुद्ध झाल्याने नियोजित सभा होऊ शकली नाही. या प्रकाराची तक्रार पोलिसांसह वरिष्ठांकडे करण्यात आली आहे.

पहा व्हिडिओ-

साकोलीपासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत विरशी येथे सोमवारी ११ वाजता सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक हेमंत पब्बेवार चक्क दारू पिऊन आले. ते दारुच्या नशेत इतके तर्र होते की, खुर्चीवर बसल्या- बसल्या लोळू लागले. त्यातच ते बेशुद्ध झाले.

ग्रामपंचायतीच्या महिला आणि पुरुष सदस्यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते उठूही शकत नव्हते. परिणामी, पदाधिकाऱ्यांची सभा होऊ शकली नाही. त्यामुळे सभा रद्द करावी लागली. आता यांची वरिष्ठाकडे तक्रार करण्यात आली आहे. खंडविकास अधिकारी आणि पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांना भेटून घटनेची माहिती दिली गेली आहे. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो वायरल झाले आहेत.

Edited By- Digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghee With Warm Water: सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा तूप घ्या; शरीराला मिळतील हे 6 मोठे फायदे

Maharashtra News Live Update: कोकणात देखील दुष्काळाची परिस्थिती

Political News: मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, राजकीय समिकरणं बदलणार

Bribe Case : मुंबईत २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, २ लाखांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं

RBI Repo Rate Hike: होम लोन घेणाऱ्यांचे टेन्शन वाढलं, EMI वाढण्याची शक्यता; RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT