Bhandara Rain Update Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Rain Update: जिल्ह्यात २४ तासापासून सर्वदूर दमदार पाऊस; नदी नाल्यांना पाणी

Bhandara News : जिल्ह्यात २४ तासापासून सर्वदूर दमदार पाऊस; नदी नाल्यांना पाणी

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : मागील काही दिवसांपासून दमदार पावसाची प्रतीक्षा लागून होती. यानंतर भंडारा जिल्ह्यात काही भागात पावसाची (Rain) हजेरी लागली होती. मात्र मागील २४ तासात जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला आहे. यामुळे भंडारा (Bhandara) जिल्ह्यात वैनगंगा नदीचा जलसाठ्यात वाढ झाल्याने गोसीखुर्द धरणाचे ३३ पैकी ३० दरवाजे ०.५ मीटरने उघडण्यात आले आहे. (Latest Marathi News)

भंडारा जिल्ह्यात यावर्षी शेतकऱ्यांना दमदार पावसाची आशा होती. मात्र अद्यापपर्यंत हवा तसा पाऊस बरसलेला नव्हता. मात्र काल सायंकाळपासून पावसाचा जोर वाढला असून सर्वदूर दमदार पावसाने (Heavy Rain) सर्वच तालुक्यात हजेरी लावली आहे. रात्रभर दमदार पाऊस बरसल्याने नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. तर जिल्ह्यात पावसामुळे कुठलेही नुकसान झाले नाही. 

गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडले 

भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून गोसीखुर्द धरणाचे ३३ पैकी ३० दरवाजे ०.५ मीटरने उघडण्यात आले असून नदी काठील गावाना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर सतत पाऊस बरसत असल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT